AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 Idiots | ‘थ्री इडियट्स’मधील ‘लायब्रेरियन’चं निधन; इमारतीवरून पडल्यानंतर अखिल मिश्रा यांनी गमावले प्राण

आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' या चित्रपटात भूमिका साकारलेले अभिनेते अखिल मिश्रा यांच्या निधनाचं वृत्त समोर येत आहे. एका इमारतीवरून खाली पडल्यामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. ते 58 वर्षांचे होते. थ्री इडियट्स या चित्रपटात त्यांनी लायब्रेरियन दुबेची भूमिका साकारली होती.

3 Idiots | 'थ्री इडियट्स'मधील 'लायब्रेरियन'चं निधन; इमारतीवरून पडल्यानंतर अखिल मिश्रा यांनी गमावले प्राण
अभिनेते अखिल मिश्राImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 1:21 PM

मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात लायब्रेरियन दुबेची भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचं निधन झालं आहे. एका उंच इमारतीवरून पडून त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचे मित्र आणि ॲक्टिंग कोच कुलविंदर बक्षी यांनी अखिल मिश्रा यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अखिल हे 58 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. अखिल यांनी बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी भंवर, उतरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, भारत एक खोज, रजनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर डॉन, हजारों ख्वाहिशें, गांधी माय फादर, शिखर, थ्री इडियट्स यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली लायब्रेरियन दुबेची भूमिका विशेष गाजली.

अखिल यांनी जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्टशी लग्न केलं. 3 फेब्रुवारी 2009 मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर 30 सप्टेंबर 2011 रोजी त्यांनी पारंपरिक विवाहपद्धतीनुसार पुन्हा लग्न केलं. अखिल यांच्या निधनाचं वृत्त समजताच सुझान पूर्णपणे खचली. ‘मी पूर्णपणे खचले आहे, माझ्या जोडीदाराने मला एकटं सोडलं’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. अखिल यांनी 1983 मध्ये मंजू मिश्रा यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. 1997 मध्ये दोघांचे मार्ग वेगळे झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. मंजू यांना घटस्फोट दिल्यानंतर अखिल यांच्या आयुष्यात सुझान आली.

हे सुद्धा वाचा

अखिल यांनी पत्नी सुझानसोबत काही चित्रपट आणि मालिकांमध्ये एकत्र काम केलं होतं. कर्म या चित्रपटात, मेरा दिल दिवाना या मालिकेत आणि मजनू की ज्युलिएट या लघुपटात दोघांनी सोबत काम केलं. सुझान विविध भाषांमधील चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करते. तिने कसौटी जिंदगी की, सावधान इंडिया, एक हजारों में मेरी बहना है, चक्रवर्ती अशोक सम्राट, ये रिश्ता क्या कहलाता है यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सुझानने पडद्यावर अनेकदा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भूमिका साकारली आहे.

पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात.
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं...
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं....
आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात...
आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात....
तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट.
भारतानं एका झटक्यात पाकच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच म्हणाल....
भारतानं एका झटक्यात पाकच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच म्हणाल.....
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!.
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त.
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?.