ऐतिहासिक क्षणांचा चित्रपट ’83’ होळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

मुंबई : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मार्चमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. ज्यामुळे अनेक चित्रपटांची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात झाली होती. त्यानंतर अनलॉकमध्ये चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, बिग बजेटच्या चित्रपटांना यामुळे फटका बसत आहे. आता 1 फेब्रुवारीपासून चित्रपटगृहे 50 टक्क्यांहून अधिक क्षमतेसह उघडली जाऊ शकतात. त्यानंतर, निर्मात्यांनी त्यांचा मोठा […]

ऐतिहासिक क्षणांचा चित्रपट '83' होळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार?
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 2:53 PM

मुंबई : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मार्चमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. ज्यामुळे अनेक चित्रपटांची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात झाली होती. त्यानंतर अनलॉकमध्ये चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, बिग बजेटच्या चित्रपटांना यामुळे फटका बसत आहे. आता 1 फेब्रुवारीपासून चित्रपटगृहे 50 टक्क्यांहून अधिक क्षमतेसह उघडली जाऊ शकतात. त्यानंतर, निर्मात्यांनी त्यांचा मोठा बजेटचे चित्रपट रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे.( ’83’ movie coming soon Will be released in theaters)

रिलायन्स एंटरटेनमेंटनेही आपला आगामी चित्रपट ’83’ चित्रपटगृहात रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे. हा ’83’ चित्रपट होळीला प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्याता आहे. रणवीर सिंहचा हा चित्रपट ’83’ एप्रिल 2020 मध्ये रिलीज होणार होता पण लॉकडाऊनमुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली मात्र, अद्यापही चित्रपटाची रिलीजची नवीन तारीख समोर आलेली नाही. रिलायन्स एंटरटेनमेंटच्या हा एकच नव्हे तर दोन बिग बजेट चित्रपट रिलीजची वाट पहात आहेत.

त्यामध्ये रणवीर सिंगची 83 आणि अक्षय कुमारचा सूर्यवंशी हे दोन चित्रपट आहेत. या अगोदर होळीच्या निमित्ताने सूर्यवंशीच्या रिलीजचे नियोजन करण्यात आले होते, पण हॉलिवूड अ‍ॅक्शन चित्रपट गॉडजिला वर्सेज कॉन्ग रिलीजच्या तारखेमुळे गडबड झाली.रिलायन्स एंटरटेनमेंट 83 हा चित्रपट 1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या कहाणीवर आधारित आहे.

या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. 83 चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने माजी भारतीय क्रिकेट कपिल देव म्हणूनची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कपिल देवच्या पत्नीची भूमिका दीपिका पादुकोण साकारत आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात इतरही मोठे चेहेरे दिसणार आहेत.

संबंधित बातम्या : 

Congratulations | शिल्पा रावची मित्रासोबत लगीनगाठ, लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर!

Confirmed | मार्च महिन्यात नाही तर ‘या’ महिन्यात करिना सैफच्या घरी येणार नवा पाहुणा!

MeToo | प्रिती झिंटाच्या 2 वर्षांपूर्वीच्या विधानाची सोना महापात्राकडून जोरदार खिल्ली!

( ’83’ movie coming soon Will be released in theaters)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.