ईशा देओलच्या आयुष्यात वादळ, नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर… थेट ‘हे’ गंभीर आरोप आणि..
Esha Deol : ईशा देओल ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसत आहे. ईशा देओल हिने नुकताच तिच्या पतीसोबत घटस्फोट घेतलाय. या घटस्फोटानंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ईशा देओल हिला दोन मुली आहेत. आता आता अनेक गंभीर आरोप हे केले जात आहेत.
मुंबई : हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. ईशा देओल हिच्या खासगी आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. ईशा देओल हिने पती भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून यांच्या घटस्फोटाच्या चर्चा या सतत रंगताना दिसल्या. मात्र, शेवटी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घटस्फोटावर भाष्य केले. ईशा देओल आणि भरत यांना दोन मुली देखील आहेत. ईशा देओल आणि भरत तख्तानी हे आता विभक्त झाले आहेत.
ईशा देओल हिच्या घटस्फोटानंतर अनेकांना प्रश्न पडलाय की, भरत तख्तानी आणि ईशा देओल यांच्या घटस्फोटाचे नेमके कारण तरी काय? कारण भरत तख्तानी आणि ईशा देओल यांनी थेट घटस्फोटाचे पाऊस उचलले. विशेष म्हणजे भरत तख्तानी आणि ईशा देओल यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट करूनच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
भरत तख्तानी आणि ईशा देओल हे शाळेतील एका प्रोग्राममध्ये पहिल्यांदा भेटले. हेच नाही तर पहिल्याच भेटीमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. ईशा देओल हिने आपला नंबर भरत याला थेट एका टिशू पेपरवर लिहून दिला. ईशा देओल हिने काही बाॅलिवूड चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. सोशल मीडियावर चांगली फॅन फाॅलोइंग तिची बघायला मिळते.
भरत तख्तानी आणि ईशा देओल यांच्या घटस्फोटानंतर विविध चर्चा रंगत आहेत. भरत तख्तानी याचे विवाहबाह्य संबंधच असल्यानेच ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले जाते. भरत तख्तानी याच्या विवाहबाह्य संबंधामुळेच ईशा देओल याने भरतसोबत घटस्फोट घेतल्याचे सांगितले जाते.
फक्त विवाहबाह्य संबंधच नाही तर ईशा देओल हिने भरत तख्तानी याच्या कुटुंबामुळेही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले. ईशा देओल हिने दुसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर भरत हा नाराज होता. हेच नाही तर भरत हा दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतरच ईशा देओल हिच्यावर सतत चिडचिड करत असल्याचे सांगितले जाते. घरात ईशा देओल हिला शाॅर्ट कपडे घालण्याची परवानगी देखील नव्हती.