प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्या कुटुंबावर मोठं संकट, बायको आणि मुलीवर पोक्सो दाखल; एकता कपूर गोत्यात

Ekta Kapoor: प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांच्या कुटुंबावर मोठं संकट, बायको आणि मुलीवर पोक्सो दाखल; एकता कपूर गोत्यात, काय आहे प्रकरण..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एकता कपूर याची चर्चा...

प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्या कुटुंबावर मोठं संकट, बायको आणि मुलीवर पोक्सो दाखल; एकता कपूर गोत्यात
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 4:35 PM

Ekta Kapoor: प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांच्या कुटुंबावर मोठं संकट ओढवलं आहे. जितेंद्र यांची पत्नी शोभा कपूर आणि मुलगी एकता कपूर यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरिवली एमएचबी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

शेरा सत्यनारायण पुरोहित यांनी एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात लहान मुलांच्या छळवणुकीची बोरिवली एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी या दोघी मायलेकींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र, या प्रकरणामुळे एकता आणि शोभा कपूर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकता आणि वाद…

एकता कपूर आणि वाद हे समीकरणच झालं आहे. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेली असते. हे वाद अत्यंत गंभीरही असतात. सर्वात आधी एकताने कॉन्ट्रॅक्टमध्ये न्यूडिटीचा क्लॉज तयार केला होता. कलाकारांनी न्यूड सीन देण्यास नकार देऊ नये आणि सेन्सॉर बोर्डाच्या कैचीतूनही सुटता यावं म्हणून तिने ही शक्कल लढवली होती. त्यामुळे एकच वाद उठलं होतं.

हे सुद्धा वाचा

जोधा-अकबर या टीव्ही सीरिअलवरूनही तिला ट्रोल करण्यात आलं होतं. या शोमध्ये तिने जोधाची व्यक्तीरेखा चुकीची दाखवली होती. त्यामुळे राजपूत क्षत्रिय अखिल भारतीय सभेने तिच्याविरोधात जोरदार निदर्शने केली होती. त्यामुळे तिला ही सीरिअल बंद करावी लागली होती.

दृश्यम या मल्याळम सिनेमाच्या निर्मात्यांसोबतही एकताचा वाद झाला होता. या सिनेमाची कहानी जापानी नॉव्हेल “द डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स”वर आधारीत असल्याची अफवा होती. या कादंबरीचे कॉपीराईट आपल्याकडे असून दृश्यमच्या निर्मात्याने त्यावर सिनेमा बनवलाच कसा? असा तिचा सवाल होता.

टीव्ही स्टार राजीव खंडेलवालसोबतही तिचा वाद झाला होता. एकताशिवाय मी यश मिळवू शकतो, असं राजीव म्हणाला होता. त्यावर पलटवार करताना मी तुला कोणत्याही शो आणि सिनेमात काम देणार नाही, असं एकताने म्हटलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये सेटलमेंटही झाली होती.

ट्रीपल एक्स या वेब सीरिजमध्ये तिने जवानांच्या पत्नींची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने दाखवली होती. त्यामुळे माजी सैनिकांनी तिच्या विरोधात रोष व्यक्त करतानाच एकता आणि शोभा कपूर यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. बेगुसराय कोर्टाने त्यांच्या विरोधात अरेस्ट वॉरंट बजावलं होतं.

Non Stop LIVE Update
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु.
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले.
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?.
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान.
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध.
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील.
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.