Prajakta Gaikwad | अलकाताई आईसारख्या, मात्र नराधमाची पाठराखण, प्राजक्ता गायकवाडचे धक्कादायक आरोप

मालिकेतील सहकलाकार विवेक सांगळे याने चित्रीकरणादरम्यान अनेकदा शिवागाळ केला, असा आरोप प्राजक्ताने केला आहे.

Prajakta Gaikwad | अलकाताई आईसारख्या, मात्र नराधमाची पाठराखण, प्राजक्ता गायकवाडचे धक्कादायक आरोप
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 2:01 PM

मुंबई : ‘आई माझी काळूबाई’ ही नवी मालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मालिकेच्या निर्मात्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ताला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर आता मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Actress Prajakta Gaikwad) हिने, आपल्या सहकलाकाराच्या वागणुकीमुळे ही मालिका सोडत असल्याचे म्हणत, अलका कुबल यांच्यावर पलटवार केला आहे.(Aai Majhi Kalubai Fame Actress Prajakta Gaikwad reaction on exit)

मालिकेतील सहकलाकार विवेक सांगळे याने चित्रीकरणादरम्यान अनेकदा शिवागाळ केला, असा आरोप प्राजक्ताने केला आहे. तसेच, आपल्या आईबद्दलही अपशब्द बोलले गेल्याचे तिने म्हटले आहे. ‘अलका ताई माझ्यासाठी आईसारख्या आहेत. मात्र, त्या या नराधमांना पाठीशी घालत आहेत. माझी बदनामी करत आहेत’, असे आरोप प्राजक्ताने केला आहे. त्याचबरोबर, ‘स्वतःच्या मुलींसोबत असे काही झाले असते तर, अलका ताई अशाच वागल्या असता का?’, असा सवालही प्राजक्ताने विचारला.

वारंवार तक्रार करूनही दाखल घेतली नाही : प्राजक्ता गायकवाड

अलका कुबल यांच्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण साताऱ्यात सुरू होते. मात्र, मागच्या महिन्यात या सेटवर काही लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर गावकऱ्यांनी गावात चित्रीकरण करण्यास नकार दिला. त्यामुळे पुढील चित्रीकरण मुंबईत करण्यात यावे, असे ठरले होते. म्हणून सगळे क्रू-मेंबर मुंबईला परतले. विवेक आणि प्राजक्ताला एकाच गाडीने परतायचे होते. मात्र, विवेकला उशीर झाल्याने प्राजक्ताने कारण विचारले. त्याने आपण कोव्हिड रुग्णांना दाखल करून येत असल्याचे सांगितल्यावर ती थोडी घाबरली.

मात्र हे बोलून दाखवल्यावर विवेकने मला शिवीगाळ करत, माझ्या आईबद्दल अपशब्द उच्चारले, असा आरोप प्राजक्ताने केला.(Aai Majhi Kalubai Fame Actress Prajakta Gaikwad reaction on exit)

अलकाताईंचे आरोप खोटे

प्राजक्ताच्या एक्झिटवर बोलताना अलका कुबल यांनी ती सतत परीक्षेच्या नावाने सुट्या घेते आणि कार्यक्रम करते, असा आरोप केला होता. यावर प्राजक्ताने आपली बाजू स्पष्ट केली आहे. ती म्हणते, ‘मी परीक्षेसाठी सुटी घेणार हे आधीच सांगितले होते. माझ्यामुळे कधीच चित्रीकरण थांबलेले नाही. मी इव्हेंटची सुपारी घेते, असा आरोप झाला, त्यात तथ्य नाही. कोरोनामुळे सध्या इव्हेंट बंद आहेत. त्यामुळे हे कारण पटणारं नाही.’

‘मालिकेत मला तोकडे कपडे घालण्याचे काही प्रसंग होते, त्याला माझा विरोध होता. त्यांनतर मला चक्क रक्त लागलेली साडी दिली गेली. माझ्या आईने त्याविषयी विचारले तर, त्याला माझ्या आईचा हस्तक्षेप म्हटले गेले.’(Aai Majhi Kalubai Fame Actress Prajakta Gaikwad reaction on exit)

मालिकेचे पैसे दिलेले नाहीत

मी एका सामान्य घरातील मुलगी आहे. माझे वडील 8 ते 10 तास काम करतात तेव्हा, आमच्या घरात चूल पेटते. असे असतानाही मला आतापर्यंत मालिकेचा एकही रुपया मिळालेला नाही. उलट मला बदनाम केले जाते आहे. मला या मालिकेचे आतापर्यंत एकही दिवसाचे मानधन मिळालेले नाही’, असे प्राजक्ताने म्हटले आहे.

फक्त मालिका, चित्रपट किंवा वेब सीरीजच करायच्या, असेकाही मी ठरवलेले नाही. त्यामुळे यापुढे मला रंगभूमी वर नाटकही करायला आवडेल. मी जे काही करन ते समरसून करेन, असे म्हणत तिने आपल्या भविष्याच्या वाटचालीवर भाष्य केले. तसेच, मी अजून राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही विचार केलेला नाही. मात्र, जे करेन ते मनापासून करेन, असे प्राजक्ताने म्हटले.

(Aai Majhi Kalubai Fame Actress Prajakta Gaikwad reaction on exit)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.