आयरा खान वडिलांचं भव्य घर सोडून राहतेय अशा घरात, पाहा कसा आहे हॉल, बेडरुम, बाथरुम?
Ira Khan | लग्नानंतर आमिर खान याची लेक आयरा राहते सासरच्या मंडळींसोबत राहते अशा घरात... कसा आहे हॉल, बेडरुम, बाथरुम? व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... आयरा खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...
अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हिचं आयुष्य देखील दुसऱ्या स्टारकिड्स प्रमाणे आलिशान घर, परदेशात फिरणं, कोणत्या थीमवर बोस्ड बेडरूम… असं असेल. पण असं काहीही नाही. आयरा हिला सामान्य आयुष्य जगायला आवडतं. लग्नानंतर देखील आयरा सामान्य जीवन जगत आहे. आयरा हिने ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केलं आहे. राजस्थान याठिकाणी मोठ्या थाटात आयरा – नुपूर यांनी लग्न केलं. आयरा हिच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
आयरा लग्नानंतर पती नुपूर याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. लग्नानंतर पती नुपूर याच्यासोबत जुन्या घरात राहते. वडिलांचं आलिशान घर सोडून आयरा पती आणि सासूबाईंसोबत साध्या घरात राहते आहे. नुपूर आणि त्याची आई कायम सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत असतात.
View this post on Instagram
आयरा आणि नुपूर यांच्या बेडरूमचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दोघांचं बेडरुम कोणत्या थिमवर बेस्ड नसून अगदी साधं आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. शिवाय त्यांच्या घरातील स्वयंपाक घराचा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, नुपूर एक फिटनेट ट्रेनर आहे. अनेक सेलिब्रिटींसाठी नुपूर याने काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील नुपूर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. नुपूर कायम व्हिडीओ, फोटो पोस्ट करण्यासाठी बाथरुममध्ये असलेल्या आरशाचा वापर करतो.
View this post on Instagram
आयरा लग्नानंतर ज्या घरात राहते त्या घरातील हॉल देखील अत्यंत साधा आहे. आयरा खान हिच्या सासूबाई कथक नृत्यांगना आहे. त्या कायम हॉलमध्ये व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आयरा खान हिच्या सासूबाईंनी अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या मुलींना कथकचं प्रशिक्षण दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयरा खान हिची चर्चा रंगली आहे.
आयरा खान अभिनेता आमिर खान याची लेक असल्यामुळे कायम चर्चेत आहे. आयरा अभिनेत्री नसली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आयरा खान कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.