‘लगान’ मधून चर्चेत आलेली गोरी मॅडम 22 वर्षांनंतर काय करते? पाहा तिचे अदाकारी फोटो
आमिर खानच्या लगान या चित्रपटातील गोरी मॅम ही व्यक्तिरेखाही खूप लोकप्रिय झाली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन 22 वर्षे झाली आहेत. गोरी मॅम 22 वर्षांनंतर कुठे आहे माहीत आहे का?
मुंबई : आमिर खानचा लगान हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आता या चित्रपटाला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. तसंच या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं त्यांच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. यामधीलच गोरी मैम ही व्यक्तिरेखा चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. पण या चित्रपटानंतर गोरी मैम कुठे आहे माहिती आहे का? तर आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
2001 साली लगान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तोच हा चित्रपट ज्यामध्ये लगानच्या बदल्यात भारतीय आणि ब्रिटिश यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना रंगतो. या चित्रपटात आमिर खानच्या विरुद्ध अभिनेत्री ग्रेसी सिंग दिसली होती. या दोघांसोबतच या चित्रपटात इतर अनेक कलाकारही मुख्य भूमिकेत दिसले होते.
View this post on Instagram
लगान चित्रपटात गोरी मैम ही एक व्यक्तिरेखाही होती, जी ब्रिटिश होती. त्यावेळी गोरी मैमची भुवन म्हणजेच आमिरशी चांगली मैत्री होते. तसंच क्रिकेटच्या सामन्यावेळी तीही भुवनला साथ देत असते. त्यामुळे गोरी मैम या व्यक्तिरेखेलाही खूप प्रसिद्धी मिळाली होती. पण गोरी मैम ही भूमिका साकारणारी अभिनेत्री नक्की कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का आणि ती आता कुठे आहे. तर आता आपण याच अभिनेत्रीबाबत जाणून घेणार आहोत.
या अभिनेत्रीनं साकारलेली गोरी मैमची भूमिका
लगान चित्रपटात गोरी मैमची भूमिका करणारी अभिनेत्री खरोखरच ब्रिटिश आहे. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री आणि मॉडेल रशेल शैले हिने साकारली होती. रशेल शैले ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. लगान हा तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट होता. पण या चित्रपटानंतर रशेल इतर कोणत्याही हिंदी चित्रपटात दिसली नाही.
View this post on Instagram
आता कुठे आहे गोरी मैम?
मिळालेल्या माहितीनुसार, गोरी मैम म्हणजेच रशेल शैले ही तिच्या देशात सक्रिय आहे. ती अभिनेत्री आणि मॉडेल असण्यासोबतच ती एक लेखकही आहे. विशेष सांगायचं झालं तर, लगानला प्रदर्शित होऊन 22 वर्षे झाली आहेत. तर दुसरीकडे रशेल ही आता 53 वर्षांची झाली आहे.
रशेल जरी 53 वर्षांची झाली असली तरी ती अजूनही तितकीच सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर नेहमी तिचे वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. तिच्या या फोटोंवर चाहते नेहमीच लाइक्सचा वर्षाव करत असतात. त्याचबरोबर रशेलनं ‘द एल वर्ल्ड और द बोन स्नॅचर’ यासारख्या चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलं आहे.