Aamir Khan: बाप गडगंज श्रीमंत, तरीही रिक्षा, बसने प्रवास का करतो आमिर खानचा मुलगा, कारण…
Aamir Khan son Junaid Khan: आमिर खान याच्याकडे आहे पाण्यासारखा पैसा, तरीही वडिलांकडून कार का घेत नाही मुलगा? रिक्षा, बसने प्रवास करतो आमिरचा मुलगा, कारण जाणून म्हणाल..., आमिर खान याच्या मोठ्या मुलाबद्दल फार कमी लोकांना आहे माहिती...
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमिर खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आमिर खान याचं नाव सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत देखील अव्वल स्थानी आहे. शिवाय आमिर खान रॉयल आयुष्य जगतो. पण आमिर खान याचा मुलगा जुनैद खान प्रचंड साध आयुष्य जगतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत आमिर खान म्हणाला होता, त्याला मुलासाठी कार खरेदी करायची आहे. पण मुलाने कार खरेदी करण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. आमिर खानच्या या वक्तव्यावर जुनैद याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत जुनैद खान याला विचारण्यात आलं, ‘तुझे वडील कायम म्हणतात की, तुला ट्रेनने प्रवास करायला आवडतो?’ यावर जुनैद म्हणाला, ‘माझे वडील लहान – लहान गोष्टी मोठ्या करुन सांगतात. मी फक्त प्रवासासाठी सोपा मार्ग शोधत असतो. मुंबईत मी कायम रिक्षाने प्रवास करतो. रिक्षाने फिरणं मला सोयीचं वाटतं कारण पार्किंगचा प्रश्न निर्माण होत नाही आणि कारची काळजी देखील सतावत नाही… ‘ असं जुनैद म्हणाला…
View this post on Instagram
सांगयचं झालं तर, एका मुलाखतीत आमिर मुलाल शाळेतील मुलासारखा असल्याचं सांगितलं होतं. ‘जुनैदला सर्वकाही माहिती असतं. शाळेत देखील तो अव्वल असायचा. पण त्याला सर्वांपेक्षा वेगळं राहायला आवडतं. तो लोकांसोबत फार कमी बोलतो. जुनैत शांत स्वभावाचा आहे आणि त्याचं मन देखील निर्मळ आहे..’
मुलगा कार खरेदी करु देत नाही…
आमिर खान म्हणाला होता, ‘जुनैद खान 30 वर्षांचा आणि मला तो लहान असल्यापासून त्याच्यासाठी कार खरेदी करायची होती. पण त्याने मला कायम कार खरेदी करण्यासाठी नकार दिला. आता देखील तो प्रवासासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतो… बस, ट्रेनने प्रवास करायला जुनैदला आवडतं…’
जुनैद खान स्टारर ‘महाराज’ सिनेमा
जुनैद खान याच्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचा ‘महाराज’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये जुनैद याने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. ‘महाराज’ सिनेमात जुनैद याच्यासोबत जयदीप अहलावत, शरवरी वाघ आणि शालिनी पांडे यांनी देखील मुख्य भूमिका साकारली आहे.
‘महाराज’ सिनेमात झळकण्यापूर्वी जुनैद खान याने ‘प्रितम प्यारे’ सिनेमात देखील काम केलं आहे. सिनेमात जुनैत पाहुण्या कलाकाराच्या भूमित झळकला होता. सध्या सर्वत्र आमिर खान याचा मुलगा जुनैद खान याची चर्चा रंगली आहे.