Aamir Khan | “मी माझ्या मुलाला सर्वाधिक घाबरतो”; असं का म्हणाला आमिर खान?

जुनैद लवकरच अभिनयक्षेत्रातही पदार्पण करणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या 'महाराजा' या ऐतिहासिक चित्रपटात तो भूमिका साकारणार आहे. या मुलाखतीत आमिरनेही त्याचा ब्रेक लवकरच मोडणार असल्याचं जाहीर केलं.

Aamir Khan | मी माझ्या मुलाला सर्वाधिक घाबरतो; असं का म्हणाला आमिर खान?
Aamir Khan son JunaidImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 9:55 AM

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान चित्रपट निर्मितीत लवकरच पदार्पण करणार आहे. ‘प्रितम प्यारे’ असं या चित्रपटाचं नाव असून त्यात आमिर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर त्याच्या मुलाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. जुनैद हा आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांचा मुलगा आहे. मात्र लहानपणापासूनच तो मितभाषी आणि एकट्यात राहणं पसंत करणारा असल्याने त्याच्या भविष्याविषयी फार चिंता होती, असं आमिर म्हणाला. इतकंच नव्हे तर जुनैद हा इंडस्ट्रीतल्या सर्व स्टारकिड्सपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याला स्वबळावर सर्वकाही मिळवायचं असून अजूनही तो कारपेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतो, असं आमिरने सांगितलं.

इतर स्टारकिड्सपेक्षा जुनैद वेगळा

मुलाविषयी आमिर म्हणाला, “तो आता 30 वर्षांचा आहे. लहानपणापासूनच मला त्याच्यासाठी एक कार घ्यायची होती. पण आजपर्यंत त्याने मला ती कार घेऊ दिली नाही. तो अजूनही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतो. बस आणि ट्रेननेच तो प्रवास करतो. काही महिन्यांपूर्वी तो पाँडीचेरीला होता आणि बेंगळुरुला एका मित्राच्या लग्नासाठी जाणार असल्याचं त्याने मला सांगितलं होतं. त्यावर मी त्याला विचारलं की तुझ्या फ्लाइटची वेळ काय आहे? तो मला म्हणाला की मी बसने जाणार आहे. त्याला स्वतंत्र आणि आपल्याज मर्जीनुसार आयुष्य जगायला आवडतं.”

आमिरला जुनैदची सर्वाधिक भीती

जुनैद हा आपला सर्वांत मोठा निंदक असल्याचंही आमिरने या मुलाखतीत सांगितलं. “जर मी माझ्या आयुष्यात कोणाला सर्वांत जास्त घाबरत असेन, तर तो जुनैदच आहे. तो खूप शिस्तप्रिय आहे. त्याच्या मिटींगला जर मी उशिरा गेलो, तर मला ओरडा बसतो. त्यामुळे त्याच्या मिटींग्सला मी कधीच उशिरा जात नाही.”

हे सुद्धा वाचा

आमिर खानने या मुलाखतीत त्याच्याही आगामी चित्रपटाची घोषणा केली. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटानंतर त्याने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता यावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्याने सांगितलं. आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो अभिनय तर करणारच आहे, मात्र त्याचसोबतच तो या चित्रपटाचा निर्मातासुद्धा आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.