‘छावा’ वाईट सिनेमा, हा कुठला इतिहास…., प्रसिद्ध अभिनेत्याचं विधान चर्चेत
Aastad Kale on Chhaava Film: 'छावा' वाईट सिनेमा, सोयराबाई पुरुषासमोर बसून पान..., औरंगजेबाचं वय...', दोन महिन्यांनंतर सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याला का खटकला 'छावा' सिनेमा, अभिनेत्याचे धक्कादायक विधान चर्चेत,

Aastad Kale on Chhaava Film: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमाने चाहत्यंच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्यानंतर सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाला आहे. सांगायचं झालं तर, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. आता सिनेमाबाबत सर्व वाद शमल्यानंतर मराठी अभिनेता आस्ताद काळे याने केलेलं विधान चर्चेत आलं आहे. ‘छावा’ हा वाईट सिनेमा आहे आणि हा कुठला इतिहास… असं अनेक प्रश्न अभिनेत्याने फेसबूकवर काही पोस्ट शेअर करत उपस्थित केले आहेत.
फेसबूकवर पोस्ट शेअर करत आस्ताद काळे म्हणाला, ‘छावा हा वाईट सिनेमा आहे. सिनेमा म्हणून वाईट आहे.इतिहास म्हणून बघायला गेलात तरी problematic आहे. सर्वतोपरी वाईट आहे”. असं आस्ताद म्हणाला. सध्या अभिनेत्याच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
अभिनेता पुढे म्हणाला, ‘हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं?. काय पुरावे आहेत याचे? औरंगजेबाचं वय आणि आजारपण बघता तो या वेगाने चालू शकेल? असे अनेक प्रश्न अभिनेत्याने उपस्थित केले आहे.




सोयराबाई राणी यांच्याबद्दल आस्ताद म्हणाला, सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार कोणत्याही नदीकाठी. असं नाही व्हायचं हो. सोयराबाई राणी सरकार परपुरुषासमोर बसून पान लावत आहेत आणि ते खात आहेत? हे कसं चालतं? असे प्रश्न अभिनेत्याने उपस्थित केले. पण आता अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमात आस्ताद काळे याने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आस्तादने सिनेमात सूर्या या भूमिकेला न्याय दिला आहे. सिनेमात भूमिका साकारून देखील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
आस्ताद याला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, ‘इतक्या महिन्यांनंतर ‘छावा’ का खटकला?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सुरुवातीला काही राजकीय मंडळींनी सिनेमावर आक्षेप घेतला. पण सिनेमात काम करून आता आस्तादला जाग का आली?’ असाही प्रश्न नेटकरी अभिनेत्याला विचारत आहेत.