अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये ऐश्वर्या-अभिषेकच्या व्हिडीओची चर्चा

जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची धूम पहायला मिळाली. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील असंख्य सेलिब्रिटींनी हजेरी लावली. याच कार्यक्रमातील अभिषेक-ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये ऐश्वर्या-अभिषेकच्या व्हिडीओची चर्चा
अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 9:51 AM

जामनगर : 4 मार्च 2024 | सध्या फेसबुक, ट्विटर (एक्स) किंवा इन्स्टाग्रामवरील अकाऊंट उघडलं की सर्वाधिक फोटो आणि व्हिडीओ जामनगरचेच पहायला मिळत आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगची धमाल या विविध फोटो आणि व्हिडीओंमध्ये पहायला मिळतेय. देशभरातील सर्व नामांकित सेलिब्रिटी आणि त्याचसोबत परदेशाहून विविध दिग्गज या प्री-वेडिंगला उपस्थित होते. अंबानींच्या या प्री-वेडिंग कार्यक्रमाला बॉलिवूडमधील असंख्य सेलिब्रिटी उपस्थित होते. बच्चन कुटुंबीयांचं अंबानी कुटुंबाशी खास नातं आहे. अभिषेक बच्चन त्याची पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्यासोबत प्री-वेडिंगला पोहोचला. या तिघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या हे मुलगी आराध्यासोबत बसलेले दिसत आहेत. कार्यक्रमातील गाण्यांवर हे तिघं धमाल करताना पहायला मिळत आहेत. तिघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान केले आहेत. गेल्या काही महिन्यांत ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या जोरदार होत्या. मात्र वारंवार ही जोडी एकत्र दिसली आणि घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. आतासुद्धा पुन्हा एकदा ही जोडी चाहत्यांसमोर एकत्र आली आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी आराध्याच्या बदललेल्या हेअरस्टाइलवरून कमेंट केली. तर काहींनी तिच्या उंचीवरून प्रतिक्रिया दिली. ‘आराध्याला शाळा नसते का, तिला इतक्या सुट्ट्या कशा मिळतात’, असा सवालही काहींनी केला. आराध्याला लहानपणापासूनच बँग्स असलेल्या हेअरस्टाइलमध्ये पाहिलं गेलंय. तिला सतत एकाच लूकमध्ये पाहून नेटकरीसुद्धा कमेंट्स करू लागले होते. अखेर आराध्याचा वेगळा लूक नेटकऱ्यांना पहायला मिळाला आणि तो सर्वांनाच आवडला.

आराध्याला अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत विविध कार्यक्रमांमध्ये पाहिलं जातं. त्यावरून ती शाळेत जाते की नाही, तिला इतक्या सुट्ट्या कशा मिळतात, असा सवाल करत नेटकऱ्यांनी याआधीही ट्रोल केलं होतं. त्यावर अभिषेकने एका मुलाखतीत चोख उत्तर देत ट्रोलर्सना गप्प केलं होतं. ‘शनिवार-रविवार सगळ्या शाळांना सुट्ट्या असतात. त्यामुळे कृपया या गोष्टींचा बाऊ करू नका’, असं तो म्हणाला होता. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्नगाठ बांधली होती. ऐश्वर्याने 16 नोव्हेंबर 2011 रोजी आराध्याला जन्म दिला.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.