ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच अभिषेक बच्चन थेट म्हणाला, जे काही झालं ते…
ऐश्वर्या हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे तूफान चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याची तूफान चर्चा ही रंगताना दिसत आहे. अनेक व्हिडीओ हे देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनमुळे जोरदार चर्चेत आहेत. हेच नाही तर यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे देखील सांगितले जातंय. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. अभिषेक बच्चन याचे घर ऐश्वर्या राय हिने सोडल्याचे सांगितले गेले. यांच्या नात्यामध्ये सर्वकाही अलबेल नक्कीच नाहीये. दररोज अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. एका व्हिडीओमध्ये तर अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या राय हिच्याकडे दुर्लक्ष करताना देखील दिसला.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरत असतानाच आता अभिषेक बच्चन याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना अभिषेक बच्चन हा दिसला. मात्र, यावेळी पत्नी ऐश्वर्या राय हिच्याबद्दल नाही तर वडील अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना अभिषेक बच्चन हा दिसला आहे.
अभिषेक बच्चन हा म्हणाला की, मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने कोणीही मला चित्रपटांमध्ये काम देत नव्हते. अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने सर्वांनाच माझ्याकडून प्रचंड अशा अपेक्षा होत्या. मी कोणत्याही चित्रपट निर्मात्याला भेटायला गेलो की, ते मला अत्यंत प्रेमाने चित्रपटासाठी नकार देत असत.
पुढे अभिषेक बच्चन हा म्हणाला की, कोणताही चित्रपट निर्माता मला चित्रपटामध्ये काम देऊ इच्छित नव्हता. मला खूप जास्त स्ट्रगल करावे लागले. एक स्क्रिप्ट मला भेटली पण त्यासाठी माझ्या वडिलांनी नकार दिला. अमिताभ यांच्यासोबत माझी बरोबरी केली जात होती, त्यामुळे मला बऱ्याच काही गोष्टी या सहन कराव्या लागल्या आहेत.
कोणताच चित्रपट निर्माता हा मला लॉन्च करू इच्छित नव्हता. कारण मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा होतो. असे करत करत शेवटी मला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा खरोखरच घटस्फोट होणार का हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. घटस्फोटाच्या चर्चांवर अजूनही अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी काहीच भाष्य हे केले नाहीये.