‘तू ऐश्वर्या रायवर कधी बंधनं लादली आहेत का?’ या प्रश्नावर अभिषेक बच्चन याचं चोख उत्तर

पती-पत्नी यांच्यामध्ये अनेकदा वाद होत असतात, काही वाद लादलेल्या बंधनामुळे वाढतात... अशात अभिषेक बच्चन याने कधी लादली आहेत पत्नी ऐश्वर्या राय हिच्यावर बंधनं?

'तू ऐश्वर्या रायवर कधी बंधनं लादली आहेत का?' या प्रश्नावर अभिषेक बच्चन याचं चोख उत्तर
प्रेम असावं तर अभिषेक - ऐश्वर्या यांच्यासारखं... अभिनेत्याच्या नव्या पोस्टमध्ये दिसली दोघांची केमिस्ट्री
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 10:31 AM

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हे कपल बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. दोघांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत, पण आजपर्यंत दोघांची भांडणं चाहत्यांसमोर आलेली नाहीत. नेहमी ऐश्वर्या आणि अभिषेक एकमेकांचं प्रोत्साहन वाढवताना दिसतात. अभिषेक बच्चन याच्या सिनेमाचं प्रीमियर असो किंवा ऐश्वर्याचा कोणताही कार्यक्रम दोघे कायम एकत्र दिसतात. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसतात. मीडिया रिपोर्टनुसार २०१२ साली अभिषेक बच्चन याने २००७ साली झालेल्या एका कर्यक्रमातील किस्सा सांगितला. २००७ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक विवाहबंधनात अडकले.

विवाह झाल्यानंतर दोघे एकत्र‘कान फिल्म फेस्टिवल’मध्ये उपस्थित राहिले. ‘कान फिल्म फेस्टिवल’मध्ये अभिषेक याने पत्नी ऐश्वर्या राय हिच्यासोबत रेड कार्पेटवर वॉक केलं. तेव्हा अभिनेत्याला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर २०१२ मध्ये अभिनेत्याला लग्नानंतर तू कधी ऐश्वर्या रायवर बंधनं लादली आहेत का? याप्रश्नाचं चोख उत्तर दिल्यानंतर अभिषेक तुफान चर्चेत आला.

या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता म्हणाला, ‘स्वतःला असुरक्षित समजणार व्यक्ती पत्नीवर बंधनं लादू शकतो किंवा त्याला जर पत्नी विश्वास नसेल तर तो पत्नीवर बंधनं लादतो.’ पुढे अभिनेता मला, मला बिलकूल असुरक्षित वाटत नाही आणि माझा माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे. असं चोख उत्तर देत अभिनेत्याने सर्वांना थक्क केलं.

शिवाय अभिषेक याला ‘पत्नीसोबत रेड कार्पेटवर चालताना काय भावना असतात?’ असा प्रश्न देखील विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता म्हणाला, ‘पती पत्नीसोबत सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होवू शकत नाही का?’ असा उलट प्रश्न अभिनेत्याने उपस्थित केला. या मुलाखतीत अभिनेत्याने प्रश्न विचारणाऱ्याला एक प्रश्न विचारला.

अभिषेक म्हणाला, ‘ऐश्वर्या हिला कोणी नाही विचारत तिला माझ्यासोबत सिनेमाच्या प्रीमियरला आल्यावर कसं वाटतं?’ पुढे अभिनेता म्हणाला, ‘जर माझी पत्नी माझ्या प्रत्येक सिनेमाच्या प्रीमियरला येवू शकते, तर मी तिच्यासोबत रेड कार्पेटवर वॉक का नाही करु शकत?’ असा प्रश्न अभिनेत्याने उपस्थित केला.

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शिवाय ऐश्वर्या – अभिषेक त्यांची लेक आराध्या बच्चन हिच्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. अनेक ठिकाणी ऐश्वया हिला लेकीसोबत स्पॉट करण्यात येतं. आराध्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता ऐश्वर्या मोठ्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.