‘ऐश्वर्यामुळे आराध्या हिची वागणूक…’, अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य

Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा, आराध्या हिच्या वागणुकीबद्दल अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण... गेल्या काही दिवसांपासून सतत बच्चन कुटुंब आहे चर्चेत...

'ऐश्वर्यामुळे आराध्या हिची वागणूक...', अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 10:49 AM

मुंबई | 27 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. पण लेक आराध्या हिच्यामुळे दोघे विभक्त होण्याचा निर्णय घेत नसल्याची चर्चा देखील समोर येत आहे. आराध्या कायम आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत दिसते. नुकताच शाळेच्या एनुअल डे कार्यक्रमात आराध्या हिला आई – वडिलांसोबत स्पॉट करण्यात आलं. सोशल मीडियावर आराध्या हिचे अनेक व्हिडीओ देखली व्हायरल झाले. अनेक ठिकाणी आराध्या हिला स्पॉट करण्यात येतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आराध्या हिच्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात.

दरम्यान, अभिषेक याला आराध्या हिच्याबद्दल विचारण्यात आलं होत. तेव्हा अभिषेक म्हणाला होता, ‘मी आराध्या हिच्यासाठी प्रचंड सक्त वडील नाही. मी तिचे जास्त लाड देखील करत नाही. मला असं वाटतं मुलांवर प्रेम करायला हवं. रोज त्यांना प्रोत्साहित करायला हवं. भावनीक रित्या त्यांचं समर्थन करायला हवं… आजची मुलं प्रचंड हुशार आहेत…’

ऐश्वर्या आणि आराध्या यांच्याबद्दल अभिषेक म्हणाला…

मुलाखतीत अभिषेक याला विचारण्यात आलं की, आराध्या हिच्या चांगल्या संगोपनाचं श्रेय कोणाला देशील? ज्यावर अभिषेक याने पत्नी ऐश्वर्या हिचं कौतुक केलं आणि मुलीची चांगली काळजी घेतल्याचं श्रेयही ऐश्वर्या हिला दिले. यावर अभिषेक बच्चन म्हणाला, “माझ्या मुलीची काळजी घेण्याचे श्रेय मी ऐश्वर्याला देऊ इच्छितो. मी जेव्हाही चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी जातो तेव्हा ती आमच्या मुलीची पूर्ण काळजी घेते.’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेता म्हणाला, ‘ऐश्वर्या हिच्यामुळे आराध्या हिची वागणूक उत्तम आहे. ऐश्वर्या आणि मी आराध्या हिला फक्त एक चांगली व्यक्ती कशी घडवता यईल यासाठी प्रयत्न करत असतो.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

सांगायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आले आहे. ऐश्वर्या राय हिने सासर सोडल्याची देखील चर्चा आहे. ऐश्वर्या आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्यामध्ये मतभेद आहेत. शिवाय अभिषेक मुलगा आणि पती दोघांची जबाबदारी घेण्यास असमर्थ असल्याची देखील चर्चा रंगली..

पण यावर बच्चन कुटुंब किंवा ऐश्वर्या – अभिषेक यांनी मौन बाळगलं आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होत असतात.. पण सत्य नक्की काय आहे? हे अद्याप समोर आलेलं नाही.

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.