The Big Bull Trailer Out |  जगातील टॉप बिलेनिअर बनण्याचे स्वप्न पाहणारा ‘हर्षद मेहता’, पहा ‘द बिग बुल’चा जबरदस्त ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), अभिनेत्री इलियाना डीक्रूझ (Ileana Dcruz) आणि निकिता दत्ता (Nikita Dutta) यांच्या ‘द बिग बुल’ (The Big Bull) या चित्रपटाचा ट्रेलर आज (19 मार्च) रिलीज झाला आहे.

The Big Bull Trailer Out |  जगातील टॉप बिलेनिअर बनण्याचे स्वप्न पाहणारा ‘हर्षद मेहता’, पहा ‘द बिग बुल’चा जबरदस्त ट्रेलर
अभिषेक बच्चन - द बिग बुल
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 10:19 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), अभिनेत्री इलियाना डीक्रूझ (Ileana Dcruz) आणि निकिता दत्ता (Nikita Dutta) यांच्या ‘द बिग बुल’ (The Big Bull) या चित्रपटाचा ट्रेलर आज (19 मार्च) रिलीज झाला आहे. या देशात आपण काहीही करू शकतो. बनावट प्रमोटर वापरू शकतो, पोलिसांना लाच देऊ शकतो. आपण मीडियाला धमकी देऊ शकतो आणि काहीही करू शकतो. एकच नियम आहे, पकडले जाऊ नये,’ अशा संवादाने ट्रेलरची सुरुवात होते (Abhishek Bachchan starrer the big bull trailer out).

यानंतर, अभिषेक बच्चनच्या नवीन प्रवासाची सुरूवात होते. संपूर्ण ट्रेलरमध्ये शेअर बाजाराच्या खेळाविषयी दाखवले गेले आहे. शेअर बाजाराच्या या गेममध्ये हा खेळ कुठून कुठे पोहोचतो, ते पाहणे मनोरंजक असणार आहे.

पाहा चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर

अभिषेक चर्चेत!

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या नवनवीन भूमिकांसाठी खूप चर्चेत आहे. अभिषेक बच्चन याच्या आगामी ‘द बिग बुल’ (The Big Bull)  या चित्रपटाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले होते. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिषेक बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट 1992 मधील भारतीय शेअर बाजाराच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहतावर आधारित आधारित आहे. हर्षद मेहता हे शेअर बाजारातील एक मोठे नाव होते. हर्षदने अनेक आर्थिक गुन्हे केले होते, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती (Abhishek Bachchan starrer the big bull trailer out).

मोठ्या पडद्यावर दिसणार ‘हर्षद मेहता’ घोटाळा

अभिषेक बच्चन स्टारर फिल्म ‘द बिग बुल’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यातील अभिषेकचा लूक पाहून तुम्हाला त्याचा ‘गुरु’ हा चित्रपट नक्कीच आठवेल. गुरु चित्रपटात धीरूभाई अंबानीची भूमिका साकारणारा जुनिअर बच्चन आता प्रेक्षकांना ‘हर्षद मेहता घोटाळ्या’ची पडद्यावर आठवण करुन देणार आहे. 1990 ते 2000च्या दरम्यान शेअर बाजारात झालेला घोटाळा आणि संपूर्ण शेअर मार्केटला हादरवून टाकणारे घोटाळे या चित्रपटात दाखवले जातील. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोकी गुलाटी यांनी केले असून, यात अभिषेक मुख्य भूमिकेत आहे.

या चित्रपटात अशा एका माणसाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्याने भारताला स्वप्ने विकली. हा चित्रपट अजय देवगन आणि आनंद पंडित निर्मित करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे. अभिषेकशिवाय इलियाना डिक्रूझ, सोहम शाह आणि निकिता दत्तादेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

(Abhishek Bachchan starrer the big bull trailer out)

हेही वाचा :

Thalaivi Trailer Launch |  मुहूर्त ठरला! कंगना रनौतच्या वाढदिवशी ‘थलायवी’चा ट्रेलर लाँच होणार!

Ram Setu | ‘राम लला’समोर ‘राम सेतु’चा मुहूर्त संपन्न, अक्षय कुमारने शेअर केला खास फोटो!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.