Salman Khan | ‘सलमान शर्ट कढातो तेव्हा….’, अभिषेक बच्चन याच्या वक्तव्यावर ऐश्वर्या राय हिची प्रतिक्रिया

Salman Khan | 'जेव्हा सलमान शर्ट कढातो तेव्हा....', अभिषेक बच्चन याने अभिनेता सलमान खान याच्याबद्दल केलं मोठं वक्तव्य; व्हायरल व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरील भाव म्हणजे...

Salman Khan | 'सलमान शर्ट कढातो तेव्हा....', अभिषेक बच्चन याच्या वक्तव्यावर ऐश्वर्या राय हिची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 2:07 PM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : अनेक वर्षांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांचे मार्ग वेगळे झाले. पण आजही दोघांच्या नात्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. सोशल मीडियावर देखील आजही दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. आता देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, व्हिडीओमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याने सलमान खान याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी 2007 मध्ये लग्न केले होते. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर 2010 मध्ये दोघेही करण जोहरच्या टॉक शोमध्ये एकत्र पोहोचले होते. लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक कॉफी विथ करण या शोमध्ये पोहोचल्यानंतर करण दोघांना असे प्रश्न विचारले जे आजही चर्चेत आहेत.

करण सर्वप्रथम अभिषेक याला विचारतो, ‘इंडस्ट्रीमध्ये स्टायलिस्टची सर्वात जास्त गरज कोणाला आहे?’ यावर अभिषेक स्वतःचं नाव घेतो. पुढे करण विचारतो डान्सिंगचे क्लासची कोणाला अधिक गरज आहे. यावर अभिषेक म्हणतो, ‘करण तुला गरज आहेत… किती दिवसांपासून एकच स्टेप करत आहेस…’

हे सुद्धा वाचा

पुढे करण म्हणतो ‘मी काही सेलिब्रिटींची नावं घेईल, त्यांच्याबद्दल एका शब्दात सांगायचं’ हृतिक रोशन याच्यासाठी अभिषेक म्हणतो, ‘आनंदी राहा…’ पुढे करण अभिनेता सलमान खान याचा नाव घेतो, यावर अभिषेक म्हणतो, ‘त्याने आता वर्क आऊट बंद करायला हवं… कारण तो कायम शर्ट काढायला जातो आणि मला वाटतं तो यापेक्षा चांगलं काम करु शकतो…’

सलमान खान याच्या वक्तव्यानंतर ऐश्वर्या काहीही बोलत नाही शांत बसते. शिवाय व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील हाव-भावाची चर्चा तुफान रंगत आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या सेटवर सुरु झालेली दोघांच्या लव्हस्टोरीचा अंत ‘देवदास’ सिनेमाच्या सेटवर झाला.. पण दोघांच्या नात्याबद्दल चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असतात.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी २००७ साली लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न मुंबईमध्ये ठरावीक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं. लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक आता आनंदी आयुष्य जगत आहेत. दोघांना एक मुगली देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.