ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच, अभिनेत्याचे ते विधान चर्चेत, थेट म्हणाला, आयुष्यात..
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय. याबद्दल दररोज अनेक मोठे खुलासे होताना दिसत आहेत. काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असतात. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त सध्या चर्चा सुरू आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे देखील सांगितले जातंय. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याची मध्यंतरी चर्चा देखील बघायला मिळाली. मात्र, सततच्या घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन किंवा बच्चन कुटुंबियांकडून काहीच भाष्य करण्यात नाही आले. उलट सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना ऐश्वर्या राय हिने अनफाॅलो देखील केले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांकडे चाहत्यांच्या देखील नजरा लागल्या आहेत.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सतत सुरू आहे. यावर भाष्य नेमके का बच्चन कुटुंबियांकडून किंवा अभिषेक बच्चन याच्याकडून केले जात नाहीये हे सतत विचारले जातंय. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एक मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन याने एक अत्यंत मोठा खुलासा केला. ज्याची चर्चा सध्या होताना दिसत आहे.
अभिषेक बच्चन हा म्हणाला की, हे बदकाच्या पाठीवरून पाणी काढण्यासारखे आहे…याचा अर्थ असा की एखाद्यावर टीका सतत होत असेल मात्र, त्या टिकेपेक्षा त्याला मिळालेले प्रेम आणि प्रशंसा कितीतरी पट अधिक असते. नेहमीच आपण जीवनामध्ये सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. नकारात्मक गोष्टींपासून दूर जाण्याचा सल्ला नेहमीच ऐश्वर्या देते.
नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्यासाठी एक प्रकारचा सल्लाच ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याला दिलाय. मात्र, अभिषेक बच्चन याच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. चाहते सतत विचारत आहेत की, खरोखरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार का? चाहत्यांमध्ये मोठी चिंता ही बघायला मिळत आहे. काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे मुलगी आराध्या हिच्या शाळेच्या एका प्रोग्राममध्ये पोहचले होते. त्यानंतर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्ये हे दोघे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आल्याचे बघायला मिळाले. यावेळी अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या राय हिच्याकडे दुर्लक्ष करताना दिसला. ज्यानंतर परत घटस्फोटाची चर्चा सुरू झाली.