‘बिग बॉस 17’च्या या स्पर्धकाला रितेश देशमुखचा खुला पाठिंबा; लिहिली पोस्ट

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर नील भट्ट एका मुलाखतीत अभिषेक आणि इशाच्या नात्याबद्दल व्यक्त झाला होता. इशा आणि अभिषेकचा ब्रेकअप इतका वाईट होता की त्यानंतर त्याला मानसिक उपचार घ्यावे लागले होते, असं नीलने सांगितलं होतं. इशाला ही गोष्ट माहीत आहे आणि त्याचाच ती चुकीच्या पद्धतीने वापर करतेय, असं नीलने म्हटलं होतं.

'बिग बॉस 17'च्या या स्पर्धकाला रितेश देशमुखचा खुला पाठिंबा; लिहिली पोस्ट
Riteish DeshmukhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 10:18 AM

मुंबई : 4 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोच्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अभिषेक कुमार हा समर्थ जुरेलच्या कानाखाली मारताना दिसत आहे. भांडणादरम्यान समर्थ सतत अभिषेकची खिल्ली उडवत होता, म्हणून चिडलेल्या अभिषेकने त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर घरातील इतर स्पर्धकांनाही मोठा धक्का बसला. इशा मालवीय आणि समर्थ जुरेल हे अभिषेकच्या मानसिक स्वास्थावरून खिल्ली उडवताना दिसतात. भूतकाळात अभिषेकला मानसिक स्वास्थ्याशी संबंधित समस्या होत्या. त्यावरूनच दोघांनी त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. इशा अभिषेकला ‘मेंटल भोपू’ म्हणून चिडवते. त्यावर अभिषेक तिला उत्तर देतो, “तुझ्या प्रेमातच मी वेडा होतो. तू मला वेडा करून सोडलंस.”

हे भांडण इतक्यावरच थांबलं नाही. इशा नंतर अभिषेकच्या वडिलांवरून कमेंट करते. “तुझ्या वडिलांनाही माहीत आहे की तू लहानपणापासूनच वेडा आहेस. सर्वांना माहीत आहे की तू वेडा आहेस.” त्यानंतर अभिषेकसुद्धा इशाच्या आईवरून कमेंट करतो. “तुझ्या आईला तुझे कारनामे माहीत आहे. छी मुलगी.” अभिषेक कशाप्रकारे क्लॉस्ट्रोफोबिक असल्याचं नाटक करत होता हे सर्वांनी पाहिलं, असं ईशा म्हणते. यावर जेव्हा अभिषेक काही बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा समर्थ त्याच्या तोंडात कागदाचा बोळा टाकतो. अभिषेक तोंडातील तो बोळा फेकून देतो आणि समर्थच्या कानाखाली मारतो. हे पाहून घरातील सर्व स्पर्धकांना धक्का बसतो. अरुण माशेट्टी त्याच्या जागेवरून उठतो. तर आऊरा आणि अंकिता लोखंडे यांचाही चेहरा पाहण्यालायक होतो.

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचं हे वागणं पाहून प्रेक्षकांनीही आश्चर्य व्यक्त केला आहे. मात्र अनेकांनी यात अभिषेकची बाजू घेतली. ‘अभिषेकने त्याला मारणं गरजेचंच होतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘सलमानने अभिषेकच्या समर्थनात काहीतरी बोललं पाहिजे. समर्थ खूप चुकीचं वागतोय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘गेल्या तीन आठवड्यांपासून समर्थ आणि इशा हे दोघं मिळून अभिषेकला डिवचतायत. त्यामुळे अभिषेकने तरी किती सहन करावं’, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

बिग बॉसच्या घरातील या वादावर अभिनेता रितेश देशमुखच्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्याने एक्सवर ट्विट करत अभिषेकचं समर्थन केलं आहे. ‘अभिषेकसाठी मला सहानुभूती वाटते.. बिग बॉस 17’, असं त्याने लिहिलंय. रितेशसोबतच बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनीही इशा आणि समर्थची शाळा घेतली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.