AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan | महानायकावर कविता चोरल्याचा आरोप, कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता!

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात.

Amitabh Bachchan | महानायकावर कविता चोरल्याचा आरोप, कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता!
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 5:03 PM

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियावर एक कविता शेअर केली आहे. मात्र, त्या कवितेमुळे अमिताभ बच्चन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून चहावर एक कविता शेअर केली मात्र, टिशा अग्रवाल नावाच्या एका महिलेचा असा दावा आहे की, अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली कविता तिने लिहिलेली आहे. (Actor Amitabh Bachchan is likely to get into trouble)

अमिताभ बच्चन ट्रोल  याबद्दल अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवरही टिशाने कॅमेंट केली आहे- “सर, तुमच्या वॉलवर माझी कविता येणे हे माझे भाग्यच आहे, परंतू तुम्ही या कवितेला माझे नाव दिले असते तर मला खूप आनंद झाला असता, मला आशा आहे की, तुम्ही यावर उत्तर नक्की द्याल.

यानंतर एका ट्रोलर्सने अमिताभ बच्चन यांना आठवण करून दिले की, जेव्हा कुमार विश्वास यांनी त्यांच्या कवितांमध्ये हरिवंश राय बच्चन यांच्या काही ओळी वापरल्या तेव्हा तुम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होते. आणि तुम्हीच जर टिशाचे श्रेय तिला देत नाहीत हे काय आहे? त्याचप्रमाणे अनेक जणांनी अमिताभ बच्चन यांना टिशाला तिच्या कवितेचे श्रेय द्यावे अशी विनंती करत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, 30 एप्रिल 2020 रोजी ही कविता लिहिल्याचे टिशा अग्रवालचे म्हणणे आहे. जेव्हा अमिताभ बच्चन यांची पोस्ट तिने पाहिली तेव्हा तिच्या लक्षात आले की, अमिताभ बच्चन यांनी तिची कविता शेअर केली आहेत.

याबद्दल टिशाचे म्हणणे आहे की, मला असे वाटले की मी अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर कॅमेंट केल्यानंतर ते माझ्या म्हणणाकडे लक्ष देतील मात्र, तसे काहीच झाले नाही उलट त्यांनी आणि त्यांच्या टिमने माझ्याकडे दुर्लक्ष केले आहे. यानंतर काही लोकांनी टिशाला सल्ला दिला आहे की, तुम्ही अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस पाठवा. मात्र, यावर हे बघण्यासारखे आहे अमिताभ बच्चन टिशाच्या कॅमेंटला काही रिप्लाय देतात की, टिशा कायदेशीर नोटीस पाठवते.

संबंधित बातम्या : 

अन्नाथेच्या सेटवरील 8 जणांना कोरोना, आता स्वत: रजनीकांत रुग्णालयात दाखल

Big Heart | ‘रेस 3चं’ अपयश विसरून सलमान रेमोच्या मदतीला, पत्नीने मानले आभार!

(Actor Amitabh Bachchan is likely to get into trouble)

सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की...
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की....
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?.
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.