अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला NCBकडून समन्स, ड्रग्ज प्रकरणात चौकशी होणार

NCBकडून आतापर्यंत अभिनेता अर्जुन रामपालची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात NCBने अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला होता.

अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला NCBकडून समन्स, ड्रग्ज प्रकरणात चौकशी होणार
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 9:44 AM

मुंबई: बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला अंमलीपदार्थ विरोधी पथक अर्थात NCBकडून समन्स बजावण्यात आलं आहे. ड्रग्ज प्रकरणात आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. NCBच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्ज केस कनेक्शन प्रकरणी तपास यंत्रणेनं अर्जुन रामपालच्या बहिणीला समन्स बजावण्यात आलं आहे. (Actor Arjun Rampal’s sister summoned by NCB)

NCBकडून आतापर्यंत अभिनेता अर्जुन रामपालची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात NCBने अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला होता. त्यावेळी अर्जुन रामपालच्या घरी NCBच्या अधिकाऱ्यांना NDPCअॅक्टनुसार प्रतिबंध असलेली औषधं मिळाली होती. अर्जुनने आपल्या एका नातेवाईकामार्फत बेकायदेशीरपणे ही औषधं घेतली होती. या औषधांसाठी ज्या प्रिस्क्रिप्शनचा वापर करण्यात आला होता ते एक्सपायर झालं होतं.

अर्जुन रामपालने त्यावेळी सांगितलं होतं की, आपण NCBला एक विशेष औषधांचं प्रिस्क्रिप्शनही दिलं आहे. हे प्रिस्क्रिप्शन दिल्लीच्या मनोवैज्ञानिकाने आपल्याला दिल्याचं त्याने म्हटलं होतं.

अर्जुन रामपालची तब्बल 6 तास चौकशी

21 डिसेंबररोजी अर्जुन रामपालची NCBकडून चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी सुमारे 6 तास चालली. त्या दिवशी त्याला अटक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण चौकशीनंतर अर्जुनला सोडून देण्यात आलं. तत्पूर्वी NCBने त्याला 16 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं होतं. पण अर्जुनने 22 डिसेंबरला वेळ मागितली होती. पण 21 डिसेंबरला अचानक अर्जुन चौकशीसाठी आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.

प्रकरण नेमके कुठून सुरू झाले?

1. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर हे प्रकरण सुरू झाले. सुशांतच्या मृत्यूचा तपास सुरू झाला तेव्हा त्यात ड्रग्स अँगल समोर आला. ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने सर्व सुत्र हाती घेतले. एनसीबीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी केली, त्यानंतर एकामागून एक अनेक खुलासे झाले. अनेक ड्रग पेडलर्स पकडले गेले.

2. त्याच्या तपासणीदरम्यान एनसीबीने नायजेरियन तरूणाला अटक केली. ओमेगा गोडविन असे याचे नाव होते. ओमेगाला एनसीबीने ड्रग्ससह अटक केली होती. पुढे चौकशी करत असताना अगिसियालोस डेमेट्रियड्सचे नाव ड्रग्जच्या प्रकरणात जोडले गेले.

3.अगिसियालोस अर्जुन रामपालची मैत्रीण गॅब्रिएलाचा भाऊ आहे. अगिसियालोस लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये वाढदिवसाच्या प्रोग्राममध्ये असताना त्याला अटक करण्यात आली होती. एनसीबीने अगिसियालोसकडून चरस व अल्प्रझोलमच्या काही गोळ्या जप्त केल्या आहेत.

4.एनसीबीने असा दावा केला होता की, अगिसियालोस ड्रग पेडलर्सशी संपर्क साधला होता. त्यांनी रिया चक्रवर्ती, शौविक, दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांनी सुशांतसिंग राजपूत यांच्यासाठी ड्रग्स विकत घेतल्याचा आरोप केला होता.

5.अगिसियालोसच्या अटकेनंतर एनसीबीने अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकला. छापेमारी दरम्यान तपास अधिका्यांना अर्जुनच्या घरातून अशी काही ड्रग्ज सापडली, ज्यांची बंदी आहे आणि ती एनडीपीएस कायद्यांतर्गत आहेत. यानंतर अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेमिका गॅब्रिएला यांना चौकशीचे समन्स पाठविण्यात आले.

6.16 नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान अर्जुनने आपल्या घरातील प्रिस्क्रिप्शनची औषधे अधिकाऱ्यांना दिली होती. एनसीबीने दावा केला आहे की त्यांना हे प्रिस्क्रिप्शन खोटे आहे तसेच, अर्जुन रामपालने 16 नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीत तफावत दिसत आहे.

संबंधित बातम्या:

Drugs Case | 7 तासांच्या चौकशीनंतर अर्जुन रामपालची सुटका, या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याची प्रतिक्रिया!

Drugs Case | अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयातून बाहेर, तब्बल 6 तास चौकशी!

Actor Arjun Rampal’s sister summoned by NCB

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....