Grand Debut | सलमान खानप्रमाणेच ‘या’ स्टारकिडचं होणार ग्रँड लाँचिंग, ‘राजश्री’च्या चित्रपटात झळकणार नवा चेहरा!

बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खानलाही राजश्री प्रॉडक्शनने लाँच केले होते. राजश्री प्रोडक्शनच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाद्वारे सलमान खान बॉलिवूडमध्ये लाँच झाला होता.

Grand Debut | सलमान खानप्रमाणेच ‘या’ स्टारकिडचं होणार ग्रँड लाँचिंग, ‘राजश्री’च्या चित्रपटात झळकणार नवा चेहरा!
सलमान खान, राजवीर देओल
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 9:11 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक नवीन कलाकारांचे पदार्पण होत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या नवीन स्टार किड्सचा भरणा देखील होत आहे. अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मोठा मुलगा करण देओलनंतर, आता त्याचा धाकटा मुलगा राजवीर देओलदेखील (Rajveer Deol) आपल्या मनोरंजन विश्वातील पदार्पणासाठी सज्ज असल्याचे, समोर येत आहे. करण देओलला स्वतः सनीनेच बॉलिवूडमध्ये एंट्री करून दिली होती. करणने त्याच्या करिअरची सुरूवात ‘पलपल दिल के पास’ मधून केली होती, आता त्याचा धाकटा भाऊही अभिनय क्षेत्रात काम करणार आहे (Actor Dharmendra announces his grand son Rajveer Deol Bollywood debut).

करण देओल सध्या फक्त एकाच चित्रपटात दिसला आहे, पण त्याच्या दुसऱ्या प्रोजेक्टचीही चाहत्यांना प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत आता राजवीरच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या बातमीमुळे सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत.

‘हा’ दिग्गज निर्माता देणार संधी

बातमीनुसार, राजवीर ज्या चित्रपटापासून डेब्यू करणार आहे, त्या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बड़जात्याचा मुलगा अवनीश बडजात्या करणार आहे. अवनीश याचीसुद्धा ही डेब्यू फिल्म असणार आहे, जी गेल्या दोन वर्षांपासून अडकलेली होती.

एका प्रसिद्ध वेबसाईटच्या माहितीनुसार, हा चित्रपट ये जवानी है दिवानीवर आधारित असून या चित्रपटामध्ये राजवीर आणि त्याची नायिका कथेचे मुख्य घटक असणार आहेत. यासोबतच चित्रपटात अनेक तरुण व्यक्तिरेखा दिसणार आहेत, हा चित्रपट वेडिंग रोमकॉम असणार आहे. मात्र, या चित्रपटाविषयी आणि राजवीरच्या पदार्पणाविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही (Actor Dharmendra announces his grand son Rajveer Deol Bollywood debut).

सलमान खानशी जवळचा संबंध?

बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खानलाही राजश्री प्रॉडक्शनने लाँच केले होते. राजश्री प्रोडक्शनच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे सलमान खान बॉलिवूडमध्ये लाँच झाला होता. मात्र, आतापर्यंत देओल घराण्याची एक परंपरा होती. देओल परिवाराने आपल्या प्रोडक्शन हाऊसमधूनच घरातील सगळ्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. परंतु, यावेळी राजवीरच्या बाबतीत मात्र तसे घडणार नाहीय. देओल कुटुंबीयांनी एकत्रितपणे असा निर्णय घेतला आहे की, आता राजवीर राजवीरला ‘राजश्री प्रोडक्शन’ लाँच करेल. तर, दुसरीकडे ही सलमान खानची ही कल्पना असल्याचे, काहींनी म्हटले आहे.

धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर दिली गुडन्यूज

अभिनेते धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर राजवीरच्या फोटोसह ही गुडन्यूज शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, ‘माझा नातू राजवीर देओल यांचा डेब्यू सिनेमाच्या जगातातल्या नवोदित दिग्दर्शक अविनाश बड़जात्या यांच्यासमवेत. आपणा सर्वांना या दोन मुलांवर आपले प्रेम व आपुलकी लाभावी, नम्र विनंती. शुभेच्छा आणि प्रार्थना.’

 (Actor Dharmendra announces his grand son Rajveer Deol Bollywood debut)

हेही वाचा :

Video | अली गोनीशी लग्न करण्याबाबत जास्मीन भसीनचा मोठा निर्णय, ऐकून चाहतेही झाले निराश!

PHOTO | वामिकाच्या जन्मानंतर पुन्हा सेटवर परतली अनुष्का शर्मा, ‘कूल लूक’ पाहून चाहतेही उत्सुक!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.