Juhi Chawla And Shah Rukh Khan | आर्यनसाठी जुही चावला जामीनदार, शाहरुख खान आणि जुहीची केमिस्ट्री काय?; वाचा सविस्तर

आर्यन आज बाहेर येणार होता. त्यासाठी अभिनेत्री जुही चावला थेट सेशन कोर्टात दाखल झाली. शाहरुखचा मुलगा तुरुंगाबाहेर यावा म्हणून जुही कोर्टाची पायरी चढल्या. याच कारणामुळे पुन्हा एकदा शाहरुख आणि जुही यांच्यातील मैत्रभावाची चर्चा सुरु झाली आहे.

Juhi Chawla And Shah Rukh Khan | आर्यनसाठी जुही चावला जामीनदार, शाहरुख खान आणि जुहीची केमिस्ट्री काय?; वाचा सविस्तर
SHAH RUKH KHAN JUHI CHAWLA
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 7:29 PM

मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला जामीन मंजूर झाला आहे. आर्यनची तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून शाहरुखने कोर्टात वकिलांची फौज उभी केली होती. अखेर आर्यन आज बाहेर येणार होता. त्यासाठी अभिनेत्री जुही चावला थेट सेशन कोर्टात जामीनदार म्हणून दाखल झाली. शाहरुखचा मुलगा तुरुंगाबाहेर यावा म्हणून जुही कोर्टाची पायरी चढली. याच कारणामुळे पुन्हा एकदा शाहरुख आणि जुही या जोडीची चर्चा सुरु झाली आहे.

रुपेरी पडद्यावर हीट ठरली जोडी

शाहरुख खान आणि जुही चावला ही जोडी सिनेरसिकांनी डोक्यावर घेतली. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहीट ठरले. रुपेरी पडद्यावरील त्यांची केमिस्टी प्रत्यक्ष जिवनातदेखील तेवढीत जिवंत आणि खरी आहे. संकटकाळी दोघेही मित्र म्हणून एकमेकांच्या मदतीसाठी कायम उभे असतात. यावेळीदेखील आर्यनच्या सुटकेसाठी जुही जामीनदार म्हणून हजर होती. जुही आणि शाहरुख यांनी ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘येस बॉस’, ‘डुप्लिकेट’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ आणि ‘डर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी सोबत काम केले आहे. या चित्रपटांतील दोघांचा अभिनय तसेच त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे लोकांनी या जोडीला डोक्यावर घेतले. ‘राजू बन गया जेंटलमन’ चित्रपटादरम्यानअभिनेता शाहरुख खान आणि जुहीची पहिली भेट झाली होती.

जुहीने पहिल्यांदा शाहरुखला पाहिले तेव्हा काय म्हणाली ?

शाहरुखने जुहीला पहिल्यांदा पाहिल्यावर दिलेली प्रतिक्रियादेखील तेवढीच विशेष आणि भन्नाट होती. शाहरुख खानला पाहिल्यानंतर जुही चावलाने तोंड वाकडं केलं होतं. जुहीला शाहरुख अजिबात आवडला नव्हता. जुहीला ‘राजू बन गया जेंटलमन’ची स्क्रिप्ट मिळाली होती. चित्रपटाची कथा जाणून घेतल्यानंतर जुहीला तिच्या सहकलाकाराबद्दल जाणून घ्यायचे होते. अभिनेत्याने ‘फौजी’ या मालिकेत काम केल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले. पण जुहीने ती मालिका पाहिली नव्हती. तो आमिरसारखा दिसतो, हे ऐकून जुहीला आनंद झाला होता.

शाहरुखसोबतचा चित्रपट नाकारावासा वाटला

नंतर जेव्हा ती सेटवर गेली तेव्हा तिला एक सडपातळ, गडद आणि लांब केसांचा माणूस उभा दिसला होताअसं तिनं सांगितलेलं आहे. तो अजिबात आमिर खानसारखा दिसत नव्हता. त्याला पाहिल्यानंतर मला हा चित्रपट नाकारावासा वाटला होता, असंही जुहीने यापूर्वी सांगितलेलं आहे.

जुही-शाहरुख कोलकाता नाइट रायडर्सचे सह-मालक

पुढे या जोडीने अनेक चित्रपटात सोबत काम केले. ही जोडी नंतर अशी जुळली की, प्रेक्षकांनी त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं. शाहरुख आणि जुही व्यवस्यायिक क्षेत्रातदेखील रोबत आले. दोघेही इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्सचे सह-मालक आहेत. रुपेरी पडद्यापासून व्यवसायापर्यंत सोबत असलेले हे दोन्ही कलाकार चांगले मित्र आहेत.

इतर बातम्या :

आर्यनची आज सुटका नाहीच, जेल प्रशासनाकडून कायदेशीर कारण सांगत सुटकेस नकार

मानवतेच्या दृष्टीनं विचार करा, वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना 2 संधी द्या, संभाजी छत्रपतींचं उद्धव ठाकरेंना पत्र

Aryan khan Release Live Update | आर्यन खानची आज सुटका होणार नाही, आजचा मुक्कामही तुरुंगातच

Actor Juhi Chawla present in Mumbai Sessions Court today to sign bail surety of Rs 1 lakh for shah rukh khan son aryan khan releaseF

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.