अभिनेते किरण माने यांचा शिवसेनेत प्रवेश; प्रवेश करताच म्हणाले, मी…
अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप केले. त्यानंतर एकच चर्चा ही बघायला मिळाली. किरण माने हे राजकारणामध्ये प्रवेश करणार असल्याचे सतत सांगितले जात होते. शेवटी त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलाय.

मुंबई : अभिनेते किरण माने हे राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत होती. मात्र, नेमक्या कोणत्या पक्षामध्ये किरण माने हे प्रवेश करणार हे कळू शकले नव्हते. शेवटी आता किरण माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय. यावेळी किरण माने यांनी अत्यंत मोठे विधान केले. किरण माने म्हणाले की, शिवसेना सर्वसामांन्याची आहे. राजकारण गढूळ झालं असताना एकटा माणूस लढतोय. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून त्यांचासोबत येण्याचा निर्णय घेतला.
पुढे किरण माने हे म्हणाले की, संविधान वाचवण्यासाठी मी पक्षामार्फत काम करीन. मिळेल ती जबाबदारी घेऊन काम करेल. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, बीडच्या निर्भिड शिवसैनिकांनो युतीमुळे आणि मुंडे साहेबामुळे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता पालवी फुटत आहे. त्याचा वृक्ष होत आहे. मी लवकरच बीड जिल्ह्यात येणार. कर्जमाफी मोठा मोर्चा बीडचा झाला होता.
एक मोठा मोर्चा बीडमध्ये करणार. बीड मला पूर्णपणे शिवसेनामय करायचा असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, नाशिकला काळाराम मंदिरात जाणार तसेच गोदातीरी जावून आरती करणार. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हाला जे पाहवत नाही त्यामुळे आला ते खरंय. माने तुमच्याकडे शब्दाची ताकत आहे. आपण दोघेही लढू. सेनेत तुम्हाला पश्ताप होणार नाही, आलात त्याचा अभिमान वाटेल पुढेही.
अनेकदा बातम्या येतात कोणी भाजपमध्ये गेले कोणी कुठे गेले. मात्र आजच काय? विरोधी पक्षातून लोकं सत्तेत जातात. मात्र तुम्ही सत्ता आण्यासाठी आलात. सगळे सोडून इथे येणे आपण याच वर्षाची वाट बघत होतो. मी आव्हान देतो तुम्ही तिन्ही निवडणुका घ्या. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणूका एकत्र लावा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय आहे कळेलच.
तुम्ही मला राम मंदिराची प्रतिकृती दिली योगा योग की काय माहिती नाही पण लवकरच राम राज्य येणार आहे. आपण तेवीसला काळाराम मंदिरात जातोय, तुम्ही सर्वानी या. आम्ही लोकसभेत मागणी करत होतो कायदा करुन राम मंदिर करा. पण कोर्टाने निकाल दिला आणि अखेर मंदिर होतंय. मी घाटकोपरला येईन तुम्ही नियोजन करा. तुम्ही लढण्यासाठी इथे आलात, तुमचे स्वागत आहे. शिवसैनिक माझ्यासोबत आहेत हे त्यांना दाखवून देऊ, असेही उद्धव ठाकरे हे म्हणाले आहेत.