AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रोज रस्त्यांवर हत्या आणि…’, बॉलिवूड अभिनेत्याने थेट मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

बॉलिवूडमधील अनेक अभिनेते देशात, राज्यात होणाऱ्या घटनांवर भाष्य करत असतात. आपल्या बेधडक वक्यव्यांमुळे अभिनेते वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले आहेत. पण आता...

'रोज रस्त्यांवर हत्या आणि...', बॉलिवूड अभिनेत्याने थेट मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 11:32 AM

मुंबई : बॉलिवूडमधील अनेक अभिनेते देशात, राज्यात होणाऱ्या घटनांवर भाष्य करत असतात. ठळक मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडल्यामुळे अभिनेते वादाच्या भोवऱ्यात देखील अडकतात. काही दिवसांपूर्वी प्रयागराज याठिकाणी मेडिकल कॉलेजसमोर तीन हल्लेखोरांनी माजी खासदार अतीक अहमद आणि माजी आमदार अशरफ अहमद यांची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना जेव्हा घडली तेव्हा पत्रकाद देखील घटनास्थळी उपस्थित होते. या धक्कादायक घटनेनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. या हत्याकांडाच्या दोन दिवस पूर्वी पोलीस एकांउन्टरमध्ये अतीक याचा मुलगा असद याचं निधन झालं. अतीक याची हत्या आणि मुलगा असद याच्या एकांउन्टरनंतर उत्तर प्रदेश येथील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधीपक्ष नेते सतत भाजप सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे.

एवढंच नाही तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याच्या न्यायालयीन व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. यूपीमध्ये उत्तम कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेतीची शाश्वती योगी आदित्यनाथ यांनी दिली होती. शिवाय यूपीमध्ये यापुढे दंगे आणि कर्फ्यू देखील लागणार नाही असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते. योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यावर आता बॉलिवूड अभिनेता केआरके याने निशाणा साधला आहे.

केआरके ट्विट करत म्हणाला, ‘मुख्यमंत्री म्हणतात यूपीमध्ये गुंडाचा वावर आता राहिलेला नाही! पण रस्त्यांवर रोज हत्या होत आहेत! बलात्कार तर याठिकाणी साधारण गोष्ट आहे! गुंड गरिबांचं घर जाळत आहेत! बोलण्याआधी थोडा विचार करायला हवा…’ असं देखील अभिनेता ट्विट करत म्हणाला आहे. सध्या सर्वत्र केआरके याने योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. (yogi adityanath on law and order)

हे सुद्धा वाचा

केआरके कायम अनेक मुद्द्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचं मत व्यक्त करत असतो. ज्यामुळे अनेकदा अभिनेता वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला आहे. आता अभिनेता अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येबद्दल सतत ट्विट करताना दिसत आहे. अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या निधनामुळे देशात सर्वत्र खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; शनिवारी रात्री १० वाजता पोलिसांचं पथक अतिक अहमद आणि अशरफ यांना प्रयागराजमधील कोल्विन रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. दरम्यान, पत्रकार म्हणून पोचलेल्या तीन हल्लेखोरांनी दोघांवर गोळीबार केला. या हल्ल्यात अतिक आणि अशरफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सध्या याप्रकरणी चौकशी करत आहेत.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.