कोरोनाची लागण तरीही रंगांची उधळण, पीपीई कीट घालून मिलिंद सोमण-अंकिताने साजरी केली होळी!

अभिनेता मिलिंद सोमण याने क्वारंटाईन असतानाही होळी साजरी केली आहे. 55 वर्षीय अभिनेत्याने स्वत:ची होळी खेळतानाची छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत. यामध्ये त्याच्या कपाळावर होळीचे रंग दिसतायत.

कोरोनाची लागण तरीही रंगांची उधळण, पीपीई कीट घालून मिलिंद सोमण-अंकिताने साजरी केली होळी!
मिलिंद सोमण-अंकिता कोंवर
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 3:33 PM

मुंबई : होळी (Holi 2021) हा एक असा सण आहे की, प्रत्येकजण हा उत्सव साजरा करण्यासाठी उत्सुक असतो. हा दिवस प्रत्येकासाठी खास असतो, मग ते सामान्य लोक असो किंवा चित्रपटातील कलाकार. कोरोनाची लागण झाली असतानाही अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) होळी साजरी करण्यास विसरला नाही. अलीकडेच मिलिंदला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. असे असूनही, होळी साजरी करण्यापासून तो स्वत:ला रोखू शकलेला नाही. पीपीई कीट घालून होळी साजरी करतानाचे त्याचे आणि पत्नी अंकिताचे (Ankita Konwar) फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत (Actor Milind Soman and wife Ankita Konwar play holi wearing PPE kit).

सुरक्षेची काळजी घेत साजरी केली होळी!

अभिनेता मिलिंद सोमण याने क्वारंटाईन असतानाही होळी साजरी केली आहे. 55 वर्षीय अभिनेत्याने स्वत:ची होळी खेळतानाची छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत. यामध्ये त्याच्या कपाळावर होळीचे रंग दिसतायत. मिलिंदसोबत त्यांची पत्नी अंकिता कोंवर (Ankita Konwar) सुद्धा या फोटोंमध्ये दिसली आहे. तथापि, सुरक्षेची पूर्ण काळजी घेत तिने पीपीई किटही परिधान केले आहे.

पीपीई किट परिधान करून अंकिताची पतीसोबत धमाल

कोरोना विषाणू लागण झाली असल्याने, पीपीई कीट घातल्यामुळे या खास दिवशी पती-पत्नी दोघेही एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा देऊ शकले नाहीत. येथे त्यांनी एकमेकांना थोडासा रंग लावून होळीचा सण साजरा केला. यावेळी अंकिता मिलिंदसाठी या हंगामाचा पहिला आंबा घेऊन गेली होती.

पाहा ‘पीपीई कीट’ होळीचे फोटो

फोटो पोस्ट करत या मिलिंदने त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला आता इतका राग येऊ नये, कारण अंकिता पीपीई किट परिधान करून सोबत हंगामातील पहिला आंबा घेऊन आली होती.’ (Actor Milind Soman and wife Ankita Konwar play holi wearing PPE kit)

मिलिंदने मारला आंब्यावर ताव

त्यांनी पुढे लिहिले की, ‘आम्हा दोघांनाही मिठी मारणे शक्य नव्हते… मग मला स्वत:च्या हातानेच स्वतःला रंगाने लावावे लागले आणि मग पूरण पोळी देखील खाल्ली.’ मिलिंदने सांगितले की, ‘त्याने 6 हापूस आंबे खाल्ले, जे अतिशय चवदार होते.’ तथापि, कोरोना विषाणूच्या लक्षणांमुळे, तो त्याचा वास घेण्यास असमर्थ होता.

दररोज काढा पितोय!

मिलिंदने त्याच्या या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी मेथी आणि इतर गोष्टींपासून तयार केलेला काढा दररोज 5-6 वेळा पितो. आता थकवा नाही, ताप नाही, डोकेदुखी नाही, शिवाय इतर कोणतीही लक्षणे नाहीत. मी सतत झोपायचा प्रयत्न करतो. मानसिक आणि शारीरिक विश्रांती ही या आजारातून बरे होण्याची पहिली पायरी आहे.’

(Actor Milind Soman and wife Ankita Konwar play holi wearing PPE kit)

हेही वाचा :

Video | नारळ वाढवून अभिनेत्याच्या फोटोची पूजा, पवन कल्याणच्या ‘वकील साब’च्या ट्रेलर लाँच दरम्यान थिएटरमध्ये राडा!

Video | अमेरिकेच्या नेव्ही बँडने गायले ‘स्वदेस’ चित्रपटाचे गाणे, भावूक झालेल्या शाहरुखने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.