Adipurush | चित्रपटगृहानंतर ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘आदिपुरुष’; कोट्यवधींमध्ये डील मंजूर
'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच झाला मालामाल... तब्बल ७०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या 'आदिपुरुष' सिनेमाकडून निर्मात्यांच्या अपेक्षा

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त ‘आदिपुरुष’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सिनेमाचा टीझर, ट्रेलर आणि ‘जय श्री राम’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांच्या मनात सिनेमाबद्दल असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी व्हिएफएक्स, सिनेमॅटीक एक्सपीरियंस आणि कथेची चर्चा रंगली आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या कथेची चर्चा सुरु असताना, दुसरीकडे ‘आदिपुरुष’ सिनेमाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरु झालं आहे. त्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वांचं ठरणार आहे. सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील चाहत्यांना पाहता येणार असल्याची माहिती समोर येत आहे..
‘आदिपुरुष’ सिनेमात अभिनेता प्रभास, सैफ अली खान आणि अभिनेत्री क्रिती सनॉन महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सांगायचं झालं तर, तगडी स्टार कास्ट असलेला ‘आदिपुरुष’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच मालामाल झाला आहे. निर्मात्यांनी सिनेमाचे ओटीटी राइट्स कोट्यवधी रुपयांमध्ये विकले आहेत. ‘आदिपुरुष’ सिनेमा भारतीय सिनेविश्वातील सर्वात जास्त कमाई कराणारा सिनेमा ठरु शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
तब्बल ७०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाकडून निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. सिनेमा १६ जून २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास ५० दिवसांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. मीडिया रिपोर्टनुसार, निर्मात्यांची ओटीटी प्रदर्शनासाठी देखील डील पक्की झाल्याची माहिती समोर येत आहे.




रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’ सिनेमा ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे. तब्बल २५० कोटी रुपयांमध्ये डील मंजूर झाल्याची चर्चा रंगत आहे. सिनेमाने म्यूझीक, सॅटेलाईट आणि सोशल मीडिया राइट्स विकून ४३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या सर्वत्र ‘आदिपुरुष’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.
रामायणावर आधारित या सिनेमात प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनातील सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे….
सिनेमाच्या ट्रेलरवर अनेकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. रामाच्या भूमिकेतील प्रभासचं तोंडभरून कौतुक होत आहे. ‘बाहुबली’प्रमाणेच अभिनेत्याचा ‘आदिपुरुष’ सुद्धा ब्लॉकबस्टर होईल असं चाहते म्हणत आहेत. तर व्हिएफएक्समध्ये केलेला सुधार नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. त्यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..