Prateik Babbar | आईला दिली हृदयात जागा! प्रतीक बब्बरने छातीवर कोरला स्मिता पाटीलच्या नावाचा टॅटू

बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर याने आपली आई अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या नावाचा टॅटू छातीवर गोंदवून घेतला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अभिनेत्याला त्याच्या आईची आठवण आली आहे.

Prateik Babbar | आईला दिली हृदयात जागा! प्रतीक बब्बरने छातीवर कोरला स्मिता पाटीलच्या नावाचा टॅटू
प्रतीक बब्बर
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 5:17 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) याने आपली आई अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या नावाचा टॅटू छातीवर गोंदवून घेतला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अभिनेत्याला त्याच्या आईची आठवण आली आहे. प्रतीकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. प्रतीकचे चाहते त्याचे आईबद्दलचे हे प्रेम पाहून खूप आनंदित झाले आहेत. लोक त्याची खूप स्तुती करत आहेत (Actor Prateik Babbar inked mother Smita Patil name on chest share post on social media).

प्रतीक बब्बर याने शेअर केलेल्या फोटो तो आपल्या कुत्र्यासोबत जमिनीवर पडलेला दिसत आहे. फोटोमध्ये स्मिता पाटील असे नाव त्याच्या छातीवर लिहिलेली दिसत आहे. स्मिता पाटील यांची जन्म तारीख 1955 देखील या नावाखाली लिहिलेली आहे.

माझी आई माझ्या मनात कायम जिवंत राहील!

हा फोटो शेअर करत प्रतीकने लिहिले की, ‘माझ्या आईचे नाव माझ्या हृदयावर लिहिले आहे… ती नेहमी माझ्या हृदयात जिवंत राहील.’ यासोबतच ‘1955 – इन्फिनिटी’ देखील लिहिले आहे. प्रतीकचे आईबद्दलचे हे प्रेम आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

प्रतीक याने आपल्या टॅटूमध्ये स्मिता पाटील यांच्या जन्मवर्ष लिहिले आहे, तर मृत्यू वर्षाऐवजी ‘इन्फिनिटी’ची खुण केली आहे. या टॅटूमध्ये स्मिता पाटील यांच्या मृत्यूचे वर्ष त्याने लिहिलेले नाही (Actor Prateik Babbar inked mother Smita Patil name on chest share post on social media).

पाहा पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by prateik babbar (@_prat)

स्मिता पाटील यांचे निधन

विशेष म्हणजे स्मिता पाटील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी परिचित आहेत. हिंदी चित्रपटविश्वात त्यांनी अल्पावधीसाठीच काम केले, परंतु आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यानंतर ती एक स्टार म्हणून उदयास आली. स्मिता पाटील यांनी आपल्या करिअरची सुरूवात 1975 मध्ये ‘चरणदास चोर’ या चित्रपटाने केली होती.

स्मिताचे अभिनेता राज बब्बर यांच्याशी लग्न झाले होते. पण, 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी स्मिताने मुलगा प्रतीकला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच या जगाला कायमचा निरोप दिला.

प्रतीक बब्बर देखील आईप्रमाणेच उत्तम अभिनेता आहे. प्रतीक बर्‍याचदा आईची आठवण काढून भावनिक होतो. तो बर्‍याचदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आईची आठवण काढून पोस्ट शेअर करत असतो.

(Actor Prateik Babbar inked mother Smita Patil name on chest share post on social media)

हेही वाचा :

Jimmy Shergill Arrested | कोरोनाचे नियम मोडले, अभिनेता जिमी शेरगिलला लुधियानात अटक!

Video | अभिनयच नाही तर, क्रिकेटही रश्मिकाची आवड, आवडती IPL टीम विचारताच म्हणाली….

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.