AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishi Kapoor | राजू ते रौफ लाला, अभिनेते ऋषी कपूर यांची तेजस्वी कारकीर्द

ऋषी कपूर यांनी 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं (Actor Rishi Kapoor Died) होतं.

Rishi Kapoor | राजू ते रौफ लाला, अभिनेते ऋषी कपूर यांची तेजस्वी कारकीर्द
| Updated on: Apr 30, 2020 | 10:56 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज (30 एप्रिल) मुंबईत निधन (Actor Rishi Kapoor Died) झाले. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेते ऋषी कपूर यांची माहिती 

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईतील चेंबूर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव ऋषी राज कपूर. द ग्रेट शोमन राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचे ते पुत्र, तर दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे ते नातू. ‘चिंटू’ या टोपणनावाने ते प्रसिद्ध होते.

मुंबईतील चॅम्पियन स्कूल मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर राजस्थानमधील अजमेर या ठिकाणच्या मेयो महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतले.

ऋषी कपूर यांनी 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी बालकलाकार राजू म्हणून काम केलं होतं. 1973 मध्ये  प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटाने ऋषी कपूर यांना खरी ओळख मिळवून दिली. बॉबी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. गेल्या 40 वर्षांपासून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत घालवला आहे.

मेरा नाम जोकर या चित्रपटापूर्वीही त्यांनी राज कपूर यांच्या श्री 420 या चित्रपटात काम केले आहे. प्यार हुआ, इकरार हुआ या गाण्यात पावसामध्ये तीन लहान मुले चालत असतात. त्यातील एक मुलगा म्हणजे खुद्द ऋषी कपूर. ते यावेळी फक्त 3 वर्षांचे होते.

13 चित्रपटात मुख्य भूमिका

बॉबी, लैला मजून, रफू चक्कर, सरगम, कर्ज, प्रेम रोग, नगिना, हनिमून, चांदनी, हिना हे 90 दशकातील त्यांचे चित्रपट फार गाजले. खेल खेल मै, कभी कभी, हम किसीसे कम नही, बदलते रिश्ते, आप के दिवानी आणि सागर यासारख्या 13  चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

ऋषी कपूर यांनी आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका केल्या. नायकापेक्षा खलनायक म्हणून त्यांना ओळखलं जातं. या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय ठरली.

आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटात काम

ऋषी कपूर यांच्या सायको किलर या चित्रपटात चांगलाच गाजला. त्यानंतर हृतिक रोशन याच्यासोबतचा अग्निपथ चित्रपटात त्यांनी रौफ लाला या खलनायकाच्या भूमिकेत काम केले. यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता.

ऋषी कपूर यांनी १९७३ ते २००० या काळात जवळपास ५१ चित्रपटात काम केलं. यातील ४० चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. तर केवळ ११ चित्रपट हिट झाले.

१९९९ मध्ये त्यांनी आ अब लौट चले या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यात राजेश खन्ना, ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना यासांरखी तगडी स्टार कास्ट होती.

२००० नंतर त्यांनी सहकलाकार म्हणून भूमिका साकारल्या. ये हे जलवा, हम तुम, फन्ना, नमस्ते लंडन, लव आज कल, पटियाला हाऊस या सारख्या चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केले.

हाऊसफूल २ या चित्रपटात त्यांनी भाऊ रणधीर कपूर सोबत काम केले. खजाना या चित्रपटानंतर हा दोन्ही भावांचा एकमेव चित्रपट होता.

90 च्या दशकात अभिनेते अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली होती. त्यांनतर तब्बल 27 वर्षांनी 102 नॉट आऊट या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले.

ऋषी कपूर यांनी नितू सिंग यांच्यासोबत २२ जानेवारी १९८० मध्ये लग्न केले. त्यांना रणबीर कपूर आणि रिध्दिमा कपूर अशी दोन मुलं आहेत. रणबीर कपूर हा अभिनेता आहे. तर मुलगी ही डिझाईनर आहे. ऋषी कपूर हे अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करिना कपूर यांचे काका आहेत.

मेरा नाम जोकरसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 

ऋषी कपूर यांनी खुल्लम खुल्ला नावाचे आत्मचरित्र लिहिले. अवघ्या तीन वर्षांपूर्वी म्हणजे १७ जानेवारी २०१७ ला हे पुस्तक प्रदर्शित झाले होते.

ऋषी कपूर यांना मेरा नाम जोकर या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर बॉबी या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला (Actor Rishi Kapoor Died) होता.

संबंधित बातम्या : 

Rishi Kapoor | बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.