Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला, लीलावतीमध्ये उपचार सुरू

अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला आहे. सध्या त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला, लीलावतीमध्ये उपचार सुरू
saif ali khan
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 8:50 AM

अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला आहे. सध्या त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडली. वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर चोराने चाकू हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सर्जरी सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याती प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या शोधासाठी, अटकेसाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहे.

करीना आणि मुलं सुरक्षित

दरम्यान या सैफ अली खान याची पत्नी , अभिनेत्री करीना कपूर खान तसेच त्यांची मुलं सुरक्षित आहे. हल्ल्याच्या या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही. प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतात. घराभोवती लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

नेमकं काय घडलं ?

मध्यरात्री 3 च्या सुमारास हा हल्ला झाला तेव्हा सैफ अली खान हा कुटुंबियांसोबत घरी झोपला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक चोर सैफच्या घरात घुसला. त्याचवेळी घरातील काही नोकरांना हालचालीमुळे जाग आली, चोराला पाहून त्यांनी आरडाओरडा केला.  त्यांच्या आवाजाने सैफही झोपेतून जागा झाला, तो लागलीच बाहेर आला. समोर चोर पाहून सैफने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोघांमध्ये बरीच झटापट झाली.  त्याचदरम्यान चोराने सैफवर चाकूने हल्ला केला, त्यामध्ये सैफ जखमी झाला. कुटुंबीय आणि घरातील नोकर-चाकर तातडीने सैफला लीलावती रुग्णालयात घेऊन गेले, तेथे त्याच्यावर सध्या सर्जरी सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनीही काही माहिती दिली आहे.  सैफ अली खान आणि चोरामध्ये झटापट झाल्याची माहिती खरी आहे. दोघांमध्ये झालेल्या झटापटीत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून सैफच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे.

पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू असून सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या आणि सुरक्षेचे काम करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहे.  काही लोकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.