AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमारसोबत ‘केसरी’मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

केसरी यांसारख्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता संदीप नाहर यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या अभिनेत्यानं आपल्या फेसबुकवर अत्यंत भावूक पोस्ट लिहून जीवन संपवलं आहे.

अक्षय कुमारसोबत 'केसरी'मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Feb 15, 2021 | 10:48 PM
Share

मुंबई : बॉलिवूडला एका पाठोपाठ एक मोठे झटके बसत आहेत. आता अजून एका अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. अल्ट बालाजीसोबत काम केलेला, एमएस धोनी, केसरी यांसारख्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता संदीप नाहर यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या अभिनेत्यानं आपल्या फेसबुकवर अत्यंत भावूक पोस्ट लिहून जीवन संपवलं आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे की हत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.(Actor Sandeep Nahar committed suicide)

मृत्यूपूर्वी अभिनेत्याची भावनिक पोस्ट

अभिनेता संदीप नाहरने मृत्यूपूर्वी फेसबुकवरील पोस्टमध्ये आता जगण्याची इच्छा नसल्याचं म्हटलंय. “जीवनात अनेक सुख-दु:ख पाहिली. प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न केला. पण आता मी ज्या अवस्थेतून जात आहे ते सहन करण्यापलीकडे आहे. मला माहिती आहे की आत्महत्या करणं हे कायरतेचं लक्षण आहे. मलाही जगायचं होतं. पण अशा जगण्याला काय अर्थ जिथे शांतता आणि स्वाभिमान नाही. माझी बायको कांचन शर्मा आणि तिची आई वुनू शर्मा यांनी ना मला समजून घेतलं ना समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझी बायको शिघ्रकोपी आहे. तिचं व्यक्तीमत्व आणि माझं व्यक्तीमत्व वेगळं आहे, जे मॅच होऊ शकत नाही”, अशी पोस्ट अभिनेता संदीपने केली होती.

“रोज सकाळ संध्याकाळ भांडण. आता माझ्यात ऐकण्याची शक्ती नाही. त्यात कांचनची काही चूक नाही. तिचा स्वभावच तसा आहे. तिला सर्वकाही नॉर्मल वाटतं, पण माझ्यासाठी हे सगळं नॉर्मल नाही. मी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मी खूप वाईट वेळ पाहिली पण कधी अडलो नाही. डबिंग केली. जिम ट्रेनर राहिलो. वन रुम किचनमध्ये आम्ही 6 जण राहत होतो. स्ट्रगल होतं पण समाधान होतं. आज मी खूप मिळवलं आहे. पण लग्नानंतर समाधान नाही. 2 वर्षात खूप काही बदललं आहे. ही गोष्टी मी कुणासोबत शेअर करु शकत नाही. जगाला वाटतं की सर्वकाही ठिक सुरु आहे. कारण ते फक्त आमच्या सोशल पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सगळं खोटं आहे. जगाला चांगली प्रतिमा दाखवण्यासाठी हे टाकतो. पण हे सगळं खोटं आहे”, असंही संदीपने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

इतकच नाही तर संदीपने आपल्या पोस्टमध्ये बायकोच्या त्रासाबद्दल खूप सांगितलं आहे. पण मला वाटतं की मी गेल्यानंतर तिला कुणी काही बोलू नये. कारण, तिला कधीही आपल्या चूक कळणार नाही, असंही संदीपने म्हटलंय.

इतर बातम्या :

तीन मर्डर करेन, हिंमत असेल तर पकडून दाखवा, हकालपट्टी होताच शिपायाची पोलिसांना धमकी

दुसरं लग्न का केलं? भावा-भावातील वाद टोकाला, हत्याकांडाने अमरावती थरारलं

Actor Sandeep Nahar committed suicide

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.