Russia-Ukraine crisis: गोळीबार, बॉम्बफेक सुरु असतानाही युक्रेनमध्ये सुरु आहे अभिनेत्याचं काम

Russia-Ukraine crisis: राजधानी किवबरोबरच अन्य शहरांत जीव वाचवण्यासाठी नागरिकांची एकच धावाधाव सुरू झाली. अशा परिस्थितीतही अभिनेत्याने आपलं काम सुरू ठेवलं आहे.

Russia-Ukraine crisis:  गोळीबार, बॉम्बफेक सुरु असतानाही युक्रेनमध्ये सुरु आहे अभिनेत्याचं काम
Russia-Ukraine crisis
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 1:15 PM

गेल्या काही महिन्यांपासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची (Russia-Ukraine crisis) भीती अखेर खरी ठरली. रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केले आणि या हल्ल्यात ७४ लष्करी तळं उद्ध्वस्त झाले. त्यात ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाले. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी सर्व राजनैतिक संबंध तोडून देशात लष्करी कायदा लागू केला. रशियाच्या शक्तिशाली सैन्यापुढे युक्रेनची संरक्षण यंत्रणा तोकडी पडली. राजधानी किवबरोबरच अन्य शहरांत जीव वाचवण्यासाठी नागरिकांची एकच धावाधाव सुरू झाली. अशा परिस्थितीतही चित्रपट निर्माता आणि अभिनेता शॉन पेन (Actor Sean Penn) यांनी युक्रेनमध्ये चालू असलेल्या रशियन हल्ल्याबद्दल माहितीपटावर काम सुरू ठेवलं आहे. पेन यांनी पत्रकार परिषेदत हजेरी लावली, उपपंतप्रधान इरिना वेरेश्चुक (Iryna Vereshchuk) यांची भेट घेतली आणि पत्रकार, लष्करी कर्मचाऱ्यांशी रशियन आक्रमणाबद्दल चर्चा केल्याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाने गुरुवारी फेसबुक पोस्टद्वारे दिली.

‘शॉन पेन यांच्यासारखं धैर्य इतरांकडे विशेषत: पाश्चात्य राजकारण्यांकडे नाही. सध्या युक्रेनमध्ये घडत असलेल्या सर्व घटनांची नोंद करण्यासाठी आणि रशियाच्या आपल्या देशावरील आक्रमणाबद्दल जगाला सत्य सांगण्यासाठी दिग्दर्शक पेन किवमध्ये आले”, असं राष्ट्राक्षांच्या कार्यालयाने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं.

पेन हे याआधी नोव्हेंबरमध्येही तिथे होते. VICE स्टुडिओजद्वारे निर्मित प्रकल्पावर काम करण्यासाठी ते तिथे पोहोचले होते. त्यावेळच्या फोटोंमध्ये ते डोनेस्तक प्रदेशाजवळील युक्रेनियन सशस्त्र दलांच्या तुकड्यांना भेट देत असल्याचे दिसून आले. ऑस्कर विजेते पेन हे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक आंतरराष्ट्रीय मानवतावादी आणि युद्धविरोधी प्रयत्नांमध्ये सहभागी आहेत. त्यांनी CORE या ना-नफा आपत्ती निवारण संस्थेचीही स्थापना केली आहे.

संबंधित बातम्या: पुढच्या दोन वर्षांत लग्न करताय? रशिया-युक्रेन युद्धाचा तुम्हालाही फटका बसणार…

संबंधित बातम्या: भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार? जाणून घ्या काय म्हटले सरकारने

संबंधित बातम्या: भारताला गव्हाची निर्यात वाढवण्याची संधी; देशात पुरेशा प्रमाणात साठा

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.