नव्या वर्षात शाहरुख खानचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन, पठाण रिलीज होईल का?, चाहत्यांचा प्रश्न

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan )कुठल्याही सणाला आपल्या चाहत्यांना शुभेच्छा द्यायला विसरत नाही.

नव्या वर्षात शाहरुख खानचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन, पठाण रिलीज होईल का?, चाहत्यांचा प्रश्न
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 3:52 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan )कुठल्याही सणाला आपल्या चाहत्यांना शुभेच्छा द्यायला विसरत नाही. नुकताच शाहरुखने आपल्या चाहत्यांना 2021 च्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोशल मिडियावर याबाबतच व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच शाहरुखने मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. शाहरुख खानने व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, 2021 हे वर्ष सर्वांना सुरक्षित, आनंदी आणि समृद्धीचे जावो. (Actor Shahrukh Khan will make a comeback from the big screen)

व्हिडिओमध्ये शाहरुखने सांगितले की, त्याची टीमसोबत नसल्यामुळे हा व्हिडिओ त्याने स्वत: शूट केला आहे. 2020 मध्ये लोकांना किती समस्यांना सामोरे जावे लागले याबद्दल तो बोलत होता. त्यानंतर शाहरुखने चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याची चांगली बातमी दिली आहे. शाहरुख खान मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याचे ऐकल्यानंतर त्याचे चाहते आनंदित झाले आणि ट्विटरवर पठान ट्रेंड होत आहेत.

दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे शाहरुखसोबत पठाण या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुख आणि दीपिकाने पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. काही दिवस हे दोघे एकत्र चित्रपटाचे शूटिंग करत होते. शाहरुखने पहिले वेळापत्रक फक्त 20 दिवसांत पूर्ण केले आहे. शाहरुख आणि दीपिका 2021 मध्ये अबुधाबीला या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणार आहेत. जॉनही दोघांसोबत शुटिंग करणार आहे.

संबंधित बातम्या : 

Shahrukh Khan | शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर प्लास्टिक कव्हर, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

शाहरुख खानसोबत सामना पाहण्यासाठी बसलेला हा तरुण कोण?

(Actor Shahrukh Khan will make a comeback from the big screen)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.