Shreyas Talpade अद्यापही रुग्णालयातच, अँजिओप्लास्टी नंतर अभिनेत्याची प्रकृती…

Shreyas Talpade : अँजिओप्लास्टी नंतर पाच दिवसांत श्रेयस तळपदे याला मिळणार होता डिस्चार्ज, पण अद्यापही रुग्णालयातच... कशी आहे अभिनेत्याची प्रकृती मोठी अपडेट समोर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या प्रकृतीची चर्चा...

Shreyas Talpade अद्यापही रुग्णालयातच, अँजिओप्लास्टी नंतर अभिनेत्याची प्रकृती...
Shreyas Talpade
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 8:03 AM

मुंबई | 20 डिसेंबर 2023 : गुरुवारी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अभिनेत्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर अभिनेत्याला रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी माहिती समोर आली होती. पण अभिनेत्याला अद्यापही डिस्चार्ज मिळालेला नाही. आता खुद्द श्रेयस याने त्याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

नुकताच, एका वृत्तसंस्थेसोबत संवाद साधताना अभिनेता श्रेयस तळपदे याने अँजिओप्लास्टी नंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुरुवातील अभिनेत्याला त्याच्या प्रकृतीबद्दल विचारण्याच आलं. यावर श्रेयस म्हणाला, ‘मला आता पूर्वीपेक्षा बरं वाटत आहे. तुम्ही सर्वांनी केलेली प्रार्थना आणि पाठिंब्यासाठी तुमचे आभार…’ पुढे अभिनेत्याला डिस्चार्ज मिळाला का? असा प्रश्न विचारण्यात आला. ‘अद्याप नाही…’ असं श्रेयस म्हणाला… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रेयस याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी श्रेयस तळपदे याच्या कुटुंबियांनी देखील अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी श्रेयस याने कुटुंबियांकडे पाहिलं आणि हसला. अभिनेत्याची सुधारत असलेली प्रकृती पाहाता कुटुंबियांनी देखील मोकळा श्वास घेतला आहे. शिवाय आता खुद्द श्रेयस याने त्याच्या प्रकृतीची माहिती दिल्यामुळे चाहत्यांना देखील दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, 47 वर्षीय अभिनेता त्याच्या आगामी सिनेमाचं शुटिंग करत होता. शुटिंग संपल्यानंतर मुंबई येथील घरी परतल्यानंतर श्रेयस याला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो जमीनीवर कोसळला. त्यानंतर श्रेयस याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता अभिनेत्याला कधी डिस्चार्ज मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

श्रेयस तळपदे याचा आगामी सिनेमा

श्रेयस तळपदे लवकरच ‘वेलकम 3’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात श्रेयस याच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी, तुषार कपूर आणि अभिनेत्री रवीना टंडन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सिनेमा 2024 च्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.

श्रेयस तळपदे याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात आणि इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. फक्त मराठी इंडस्ट्री नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्याने स्वतःची ओळख तयार केली आहे. श्रेयस याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्याच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.