Sushant Singh Rajput Chhichhore | शेवटच्या सिनेमात आत्महत्या न करण्याचा मंत्र, आठ महिन्यांनी स्वत:चं जीवन संपवलं

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेला 'छिछोरे' हा सिनेमा सुशांतचा शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमात त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलाच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

Sushant Singh Rajput Chhichhore | शेवटच्या सिनेमात आत्महत्या न करण्याचा मंत्र, आठ महिन्यांनी स्वत:चं जीवन संपवलं
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 4:50 PM

Sushant Singh Rajput Suicide मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान  (Sushant Singh Rajput Chhichhore) मिळवलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. शेवटच्या ‘छिछोरे’ सिनेमात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलाच्या वडिलांची भूमिका साकारलेल्या सुशांतने आज स्वत:चं आयुष्य संपवलं. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सुशांत गेल्या 6 महिन्यांपासून तणावाखाली असल्याने त्याने हे टोकाचं पाऊल घेतल्याची (Sushant Singh Rajput Chhichhore) माहिती आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेला ‘छिछोरे’ हा सिनेमा सुशांतचा शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमात त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्याचा हा सिनेमा अत्यंत लोकप्रिय ठरला होता. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं कौतुकंही करण्यात आलं होतं.

‘छिछोरे’ हा एक अत्यंत सकारात्मक सिनेमा होता. “आत्महत्येविरोधात युद्ध” अशी या सिनेमाची थीम लाईन होती. अशा प्रकारच्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने स्वत: आत्महत्या करणे हे खरंच धक्कादायक आहे.

या सिनेमात सुशांत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या मुलाला पुन्हा जीवनाचा अर्थ समजावून सांगतो. जीवन किती मौल्यवान असतं, हे या सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्याने केला (Sushant Singh Rajput Chhichhore).

“छिछोरे” हा सिनेमा अशा मुलाची कहाणी आहे जो इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेत नापास झाल्यानंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो. तो एका उंच इमारतीवरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचा जीव वाचतो, पण त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. तेव्हा डॉक्टर त्याच्या पालकांना म्हणजेच अन्नी (सुशांत सिंग राजपूत) आणि माया (श्रद्धा कपूर) यांना सांगतात की त्याची परिस्थिती नाजूक आहे. आम्ही त्याला वाचवू शकतो, पण त्याला जगण्याची इच्छाच नाही.

हे ऐकल्यानंतर अन्नी आपल्या मुलाला पुन्हा जीवन जगण्याची एक उमेद देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो त्याला त्याची आणि त्याच्या 5 ‘लूझर’ मित्रांची कहाणी सांगतो. हे सर्व ऐकल्यावर अन्नीच्या मुलामध्ये जगण्याची इच्छा निर्माण होते. या सिनेमात अन्नी त्याच्या मुलाला आत्महत्येपासून वाचवण्यात यशस्वी झाला. मात्र, खऱ्या आयुष्यात तो स्वत:ला नैराश्यातून बाहेर काढू शकला नाही.

‘छिछोरे’मधील एक डायलॉग  

“हम हार-जित, स्कसेस-फेल्युअर में इतना उलझ गये हैं की जिंदगी जिना भूल गये… जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इम्पॉर्टंट हैं तो वो हैं खुद जिंदगी…”

या सिनेमाच्या तब्बल आठ महिन्यांनी आत्महत्येविरोधात लढताना सुशांतने स्वत: आम्तहत्या केली. हे अत्यंत धक्कादायक आहे.

सुशांत सिंह राजपूतची कारकीर्द

जन्म – 21 जानेवारी 1986

स्टार प्लसच्या ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेतून पदार्पण

2009 मध्ये आलेल्या पवित्र रिश्ता मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळाली.

2013 मध्ये सिनेविश्वात पदार्पण

काय पो छे पहिला हिंदी चित्रपट, सिनेमातील अभिनयासाठी फिल्मफेयरसाठी नामांकन

2016 मध्ये एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी चित्रपट तुफान गाजला

चित्रपट

  • काय पो छे
  • शुद्ध देसी रोमान्स
  • पी के
  • डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी
  • एम एस धोनी – द अनटोल्ड स्टोरी
  • राबता
  • वेलकम टू न्यूयॉर्क
  • केदारनाथ
  • सोन चीरिया
  • शेवटचा थिएटरमध्ये रिलीज झालेला – छिछोरे
  • ड्राईव्ह नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ड्राईव्ह

Sushant Singh Rajput Chhichhore

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | सुशांतपूर्वी आत्महत्या केलेले कलाकार, दिग्गजांच्या Suicide ने बॉलिवूड शोकसागरात

Sushant Singh Rajput | अब शहर भर जिक्र मेरी खुदकुशी का.. संजय राऊत-उद्धव ठाकरेही हळहळले

Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त धोनी पचवू शकेल का? धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.