‘बिहारमध्ये माझा बलात्कार आणि हत्या झाली असती’, अभिनेत्री अमिषा पटेलचा बिहारच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप

बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी गेला असताना माझा बलात्कार आणि हत्या झाली असती. मी मोठ्या मुश्किलीने त्या संकटातून सुटल्याचं अमिषाने सांगितलं आहे.

'बिहारमध्ये माझा बलात्कार आणि हत्या झाली असती', अभिनेत्री अमिषा पटेलचा बिहारच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 6:45 PM

मुंबई : अभिनेत्री अमिषा पटेलने धक्कादायक खुलासा केला आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी गेला असताना माझा बलात्कार आणि हत्या झाली असती. मी मोठ्या मुश्किलीने त्या संकटातून सुटल्याचं अमिषाने सांगितलं आहे. अमिषाने चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे नेते प्रकाश चंद्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी जबरदस्तीने आपला प्रचार करण्यास सांगितले. तसेच न केल्यास धमकीही दिल्याचा आरोप अमिषाने केला आहे (Actress Amish Patel allege LJP leader and supporter may rape and murder me in Bihar).

अमिषा म्हणाली, “मी एक पाहुणी म्हणून डॉ. प्रकाश चंद्रा यांच्याकडे गेली होती. मात्र, ते लोकांना ब्लॅकमेल करतात आणि धमकावतात. त्यांनी मला आणि माझ्या टीमला वाईट पद्धतीने धमकावलं आणि गैरवर्तन केलं. मी सायंकाळी मुंबईला परत आल्यानंतर देखील त्यांनी मला धमकी देणारे मेसेज आणि कॉल केले. तसेच माझ्याबद्दल चांगलं बोला आणि 26 ऑक्टोबरला जे घडलं त्याविषयी बोलू नका. त्यांनी मला ब्लॅकमेल करत पैसे देतो पण लोकांसमोर माझ्याविषयी चांगलं बोल असं सांगितलं.”

“प्रकाश चंद्रा यांनी मला धमकावत पाटण्यापासून 3 तास त्यांच्या प्रचारात सोबत राहावे यासाठी जबरदस्ती केली. मला त्याच दिवशी मुंबईत परतायचे होते, पण मला तसं करु दिलं नाही. मला एका गावात ठेवण्यात आलं आणि जर मी त्यांचं ऐकलं नाही तर ते मला इथंच सोडून जातील अशी धमकी दिली,” असंही अमिषा म्हणाली.

“माझ्याकडे त्यांचं ऐकण्याशिवाय पर्यायच नव्हता”

अमिषा पटेल म्हणाली, “माझी संपूर्ण टीमला मी ते म्हणतील त्याला हो म्हणण्यास सांगितलं. तसेच त्यांचे फोन आले तर अगदी आदराने बोलत कट करा असंही सांगितलं. कारण ती व्यक्ती एक ठग असून गुंडाप्रमाणे वागत होती. त्यामुळे ते माझ्यासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे होतं. मला त्यांच्यामुळे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांमुळे माझ्या आणि माझ्या टीमच्या जीवाला धोका वाटला. त्यामुळे माझ्याकडे शांत राहून ते जे सांगतील ते ऐकण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता.”

“मी बिहारमध्ये असल्याने शांत होते. मात्र, मला मुंबईला आल्यावर जगाला हे सत्य सांगायचं होतं. माझा बलात्कार आणि हत्या झाली असती. माझ्या गाडीभोवती पूर्ण वेळ त्यांच्या लोकांनी गराडा घातला होता. ते सांगतील ते सर्व करुपर्यंत मला चालून देखील दिलं जात नव्हतं,” असंही अमिषा म्हणाली.

हेही वाचा :

Bihar Polls | मास्कमुळे कोव्हिडपासून, तर मतदानामुळे बिहारचा ‘बिमार’ होण्यापासून संरक्षण : मोदी

राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहिता भंगाचा भाजपचा आरोप

पुढच्या वेळी मोदी-नितीश कुमार आले तर त्यांना पकौडे खायला घाला, राहुल गांधींचा निशाणा

Actress Amish Patel allege LJP leader and supporter may rape and murder me in Bihar

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.