पतीने दिला धोका, घरातून दिले हाकलून, 10 महिन्यातच तुटले अभिनेत्रीचे दुसरे लग्न, म्हणाली…
टीव्ही अभिनेत्री दलजीत काैर ही सध्या तिच्या कामापेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीत काैर हिने निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. मात्र, लग्नाला दहा महिने पूर्ण होत नाहीत, तोवरच तिचे हे दुसरे लग्न तुटले. दलजीत काैर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.
अभिनेत्री दलजीत काैर हिने टीव्ही मालिकांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख मिळवली आहे. दलजीत काैर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दलजीत काैर ही दिसते. दलजीत काैरची सोशल मीडियावर जबरदस्त अशीं फॅन फॉलोइंग बघायला मिळते. दलजीत काैर हिने काही महिन्यांपूर्वीच निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. निखिल पटेल याच्यासोबतचे दलजीत काैरचे हे दुसरे लग्न आहे. दलजीत काैर हिचे पहिले लग्न अभिनेता शालिन भनोट याच्यासोबत झाले आणि त्यांचा एक मुलगा देखील आहे. दलजीत काैर आणि शालिन भमोट काही वर्षांपूर्वीच विभक्त झाले.
दलजीत काैर हिने दहा महिन्यांपूर्वीच केन्याचा व्यावसायिक निखिल पटेलसोबत भारतात अत्यंत खास पद्धतीने लग्न केले. हेच नाहीतर दलजीत काैर ही लग्नानंतर केन्यात शिफ्ट देखील झाली. मात्र, लग्नाला दहा महिने पूर्ण होत नाहीत तोवरच अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठे वादळ आले आणि तिने निखिल पटेल याचे घर सोडत भारत गाठला.
दलजीत काैरने पती निखिल पटेल याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. हेच नाहीतर दलजीत काैर हिच्यासोबतचे लग्न मान्य करण्यासही चक्क निखिलने नकार दिला. दलजीत काैरचे म्हणणे आहे की, निखिलने तिला धोका दिला. सोशल मीडियावर दलजीत काैरने काही पोस्ट शेअर करत हैराण करणारे खुलासे देखील केले.
नुकताच दलजीत काैर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याचे बघायला मिळतंय. दलजीत काैर हिने एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये एक महिला दिसत असून आरशात पाहून ती स्वत:ला सांभाळत आहे. दलजीत काैरने लिहिले की, मी स्वत:ला ठिक केले आहे, स्वत:ला वाचवले आहे, माझ्याकडे मी स्वत: आहे. दलजीत काैरने लिहिले की, स्वत:ला वेळ देण्यात काहीच समस्या नाहीये.
या पोस्टसोबतच तिने एक गाणेही लावले आहे. पतीसोबत वाद सुरू झाल्यापासून दलजीत काैर ही अशाप्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना कायमच दिसते. दलजीत काैर हिच्यावर निखिलने काही आरोप केले. हेच नाहीतर केन्यातील तिचे सामान घेऊन जाण्यासाठीही त्याने नोटीस पाठवली. दलजीत काैर आणि निखिल पटेल यांच्यातील वाद चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय.