Dhanashri Kadgaonkar | ‘वहिनीसाहेबां’च्या घरी ‘युवराज’चे आगमन, सोशल मीडियावर शेअर केली आनंदाची बातमी!
धनश्रीच्या घरी छोट्या चिमुकल्याचे आगमन झाले आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
मुंबई : लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वहिनीसाहेब’ म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने तिच्या चाहत्यांना आज (29 जानेवारी) एक गोड बातमी दिली आहे. राणादाच्या ‘वहिनीसाहेब’ आता ‘आईसाहेब’ झाल्या आहेत. आई झाल्याची बातमी धनश्रीने स्वत: तिच्या सोशल मीडियावरुन दिली आहे (Actress Dhanashri Kadgaonkar gives birth to baby boy).
धनश्रीच्या घरी छोट्या चिमुकल्याचे आगमन झाले आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिचे बाळ आणि ती सुखरुप असल्याचे धनश्रीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. धनश्रीने दिलेल्या गोड बातमीने तिच्या चाहत्यांनी तिला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक सेलिब्रेटींनीही धनश्री आणि तिच्या बाळाला शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत.
धनश्रीची खास पोस्ट
‘आज सकाळीच आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. ही बातमी सांगताना मला खूप आनंद होत आहे. सर्वांच्या आशिर्वादाने मी आणि माझे बाळ आम्ही दोघेही सुखरुप आहोत. तुमच्या सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा अशाच कायम राहो’,असे धनश्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे (Actress Dhanashri Kadgaonkar gives birth to baby boy).
View this post on Instagram
(Actress Dhanashri Kadgaonkar gives birth to baby boy)
पतीला दिली वाढदिवसाची गोड भेट
काही महिन्यांपूर्वी एक खास व्हिडीओ शेअर करत गरोदर असल्याची बातमी धनश्रीनं चाहत्यांसोबत शेअर केली होती. ‘कुणीतरी येणार येणार गं …’ म्हणत पती दुर्वेशच्याच्या वाढदिवसा दिवशीच धनश्रीने ही गोड बातमी शेअर करत सगळ्याच चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता.
View this post on Instagram
(Actress Dhanashri Kadgaonkar gives birth to baby boy)
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय
धनश्री या काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. प्रेग्नंसीच्या काळातले तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आले होते. अगदी काहीच दिवसांपूर्वी धनश्रीच्या डोहाळे जेवणाचे फोटोही समोर आले होते. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकेतूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्री घराघरात पोहचली. तिची ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका चांगलीच गाजली. मालिका विश्वात सक्रिय असतानाच 2013मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली. आता खऱ्या आयुष्यातही एक नवी भूमिका सशक्तपाने सांभाळण्यास धनश्री तयार झाली आहे.
(Actress Dhanashri Kadgaonkar gives birth to baby boy)
हेही वाचा :
PHOTO | ‘वाहिनीसाहेबां’च ‘प्री-मॅटर्निटी’ फोटोशूट, पाहा धनश्रीचे खास फोटो…