AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धूम’मध्ये बिकीनी सीनपूर्वी इशा देओलची उडाली घाबरगुंडी, आई हेमा मालिनीकडून घ्यावी लागली होती परवानगी

Esha Deol Movie : धूम या गाजलेल्या चित्रपटात अभिनेत्री इशा देओलने बिकिनी घालून सीन्स केले होते. त्यावेळी तिच्या या लूकची खूप चर्चा झाली होती.

‘धूम’मध्ये बिकीनी सीनपूर्वी इशा देओलची उडाली घाबरगुंडी, आई हेमा मालिनीकडून घ्यावी लागली होती परवानगी
| Updated on: May 05, 2023 | 1:23 PM
Share

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांची कन्या अभिनेत्री इशा देओलचे (Esha deol) फिल्मी करीअर फारसे चालले नाही. पण ‘धूम’चित्रपटातील तिच्या लूकमुळे बरीच चर्चा झाली होती. यशराज फिल्मच्या या चित्रपटात तिने बिकीनी घालून सीन्स दिले होते. आता अभिनेत्रीने तिच्या बिकिनी सीनबद्दल बोलताना सांगितले की, निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राने जेव्हा तिला 2004 मध्ये आलेल्या धूम या ॲक्शन फिल्मबद्दल सांगितले होते. आणि या चित्रपटात इशाला एक बिकिनी सीन करावा लागेल, असेही नमूद केले. तेव्हा होकार देण्यापूर्वी ईशाने त्याच्याकडे एक दिवसाचा वेळ मागितला. पहिले आई (हेमा मालिनी) हिची परवानगी घ्यावी लागेल असे इशाने सांगितले.

बिकिनी सीन करण्यापूर्वी ईशा देओल खूपच घाबरली होती. याबाबत तिने आई, हेमा मालिनीशी चर्चा केली. पण हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया ईशाच्या विचारापेक्षा खूपच वेगळी होती. ईशाने सांगितले की हेमा मालिनी यांनी तिला सांगितले की, सीन चांगले शूट केले जातील, याची खात्री करून घे.

मी यापूर्वी बिकिनी घातली नव्हती असे नाही, असे इशा म्हणाली. सुट्टीत किंवा पोहताना तुम्ही स्विमसूट किंवा बिकिनी यापैकी काय घालाल? चित्रपटात बिकीनी घालायची आहे सांगितल्यानंतर, हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया अशी होती की, ‘हो ते (बिकीनी) घाल की, त्यात काय एवढं? जेव्हा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाता किंवा सुट्टीसाठी जाता, तेव्हाही बिकीनी घालताच ना. मग चित्रपटात घातली तर काय झालं ? असं सांगत हेमा मालिनी यांनी इशाला पाठिंबा दिला.

ईशा देओलने ‘धूम’ चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. चित्रपटासाठी खास प्रशिक्षण घेतले. आदित्य चोप्राने तिला चित्रपटाचे शुटिंग व्यवस्थित करण्यासाठी 6 महिन्यांचा वेळ दिला होता. आदित्य चोप्राला या चित्रपटात ईशा देओलला एका खास पद्धतीने सादर करायचे होते.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.