‘आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला…’, ‘झिम्मा 2′ सिनेमासाठी हेमांगी कवी हिची लक्षवेधी पोस्ट

Hemangi Kavi : ‘झिम्मा 2’ सिनेमा पाहिल्यानंतर असं काय म्हणाली अभिनेत्री हेमांगी कवी? सिनेमातील अभिनेत्रींबद्दल हेमांगी म्हणाली, 'आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला...', सोशल मीडियावर सर्वत्र फक्त हेमांगी कवी आणि ‘झिम्मा 2' सिनेमाची चर्चा..

'आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला...', ‘झिम्मा  2' सिनेमासाठी हेमांगी कवी हिची लक्षवेधी पोस्ट
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 8:17 AM

मुंबई | 1 डिसेंबर 2023 : 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘झिम्मा 2′ सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘झिम्मा 1′ सिनेमापेक्षा ‘झिम्मा 2′ सिनेमा अधिक उत्तम आहे… असं प्रेक्षकांचं मत आहे. ‘झिम्मा 2′ सिनेमाचं कौतुक फक्त प्रेक्षक नाही तर, सेलिब्रिटी देखील करताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘झिम्मा 2′ सिनेमाची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील फेसबुकच्या माध्यमातून सिनेमाचं आणि सिनेमातील कलाकारांचं कौतुक केलं आहे. एवढंच नाही तर ‘झिम्मा 3’ बनवच असा हट्ट हेमांगी हिने दिग्दर्शक हेमंत ढोमेकडे या पोस्टद्वारे केली आहे.

फेसबुक पोस्ट मध्ये हेमांगी म्हणाली, ‘हेमंत ढोमे अरे काय कमाल सिनेमा आहे! Frankly speaking झिम्मा १ पेक्षा झिम्मा २ जास्त जमून आलाय. कदाचित या बायकंना आम्ही झिम्मा १ पासून ओळखत होतो म्हणून हे मला वाटलं असेल. प्रत्येकीची गोष्ट वेगळी पण तितकीच प्रभावी आणि relatable! विचार करायला लावणारी आणि आचरणात आणायला कुठेही कठीन न करता सहजपणे आपल्यात बदल करू शकणारी! खरंच मज्जा आली. प्रचंड enjoy केला मी हा सिनेमा! निर्मीती सावंत!!!! काय करायचं या बाईचं! म्हणजे मला काही सुचेचना! कसं कसं करतेस गं तू! इतक्या वर्षांपासून कसं गं हे अबाधित ठेवलंयस?

‘आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला lead किंवा Heroine म्हणून बघितलं जात नाही. पटकन चरित्र कलाकार, सहाय्यक कलाकार म्हणून आपण लगेच categories करतो. Hollywood किंवा इतर कुठेही असं होत नाही. मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना Lead म्हणूनच पाहीलं जातं. Awards साठी main category मध्ये गणलं जातं. ही गोष्ट जर आपल्या इथं सुरू झाली तर त्याला तु कारणीभूत असशील ताई. इतकं भारी काम केलंयस तू!’

हे सुद्धा वाचा

‘सुहास ताई, हीच गोष्ट ‘तु तिथं मी’ च्या वेळी वाटली होती. आणि आज ही तुमची इंदू पाहून वाटलं! तो line मारायचा scene! मी तर शिट्टीच हाणली theatre मध्ये. क्या बात है! Rinku Mahadeo Rajguru दुसरं कौतुक करावंसं वाटतं ते Rinku rajguru चं. खुप समजून- उमजून काम केलंय. Typical सून न करता एकदम छान तान्या साकारली आहे. Screen वर दिसताच आपसूक आमच्या चेहऱ्यावर smile येत होतं.’

‘थोडक्यात या सासू-सूनेने लयच धमाल आणलीए! एक एक scene चोपलाय तिघींनी! जाता जाता एवढंच सांगेन Hemant Dhome आता आम्हांला झिम्मा ३ हवाय. हवाय म्हणजे हवायययययय! ते तू बाकी सिनेमे करत रहा पण झिम्मा universe ला अंत देऊ नकोस! फार फार तर काय होईल एखादा part फसेल! ठिक आहे की. पण हा खेळ थांबवू नकोस एवढीच विनंती तुझ्या सगळ्या team कडे.’ अशी भलीमोठी पोस्ट करत हेमांगी कवी हिने सिनेमाचं कौतुक केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमांगी कवी हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

‘झिम्मा 2’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. सध्या सर्वत्र ‘झिम्मा 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमाने आतापर्यंत जवळपास 6 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सिनेमा किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदाच्या वर्षी ‘झिम्मा 2’ सिनेमाने देखील विक्रम रचला आहे.

'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.