कास्टिंग काउचची ती वेदना, परीक्षेचा काळ, अभिनेत्री म्हणाली, ‘ए-लिस्ट अभिनेत्याने एकटीला…
कास्टिंग काउचच्या वेदनातून गेलेल्या अभिनेत्रीने तिचा अनुभव सांगितला. या अभिनेत्रीने साऊथ चित्रपटांपासून बॉलिवूडमध्येही काम केले आहे. तसेच अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे.
अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने साऊथ चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंत काम केले आहे. अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही तिने काम केले आहे. तामिळ चित्रपट ‘आयलान’मध्ये ईशा कोप्पीकर शेवटची दिसली होती. याआधी ती ‘फिजा’, ‘प्यार, इश्क और मोहब्बत’, ‘हॅलो डार्लिंग’ आणि ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटांमध्ये दिसली होती. अलीकडेच ईशा हिने आपल्याला वयाच्या 18 व्या वर्षी कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते असा गौप्यस्फोट केला. ए लिस्ट अभिनेत्याने तिला एकटे भेटण्यासाठी कसे बोलावले होते हे तिने सांगितले.
सिद्धार्थ कानन याला दिलेल्या मुलाखतीमध्ये ईशा कोप्पीकर हिने हा गौप्यस्फोट केला आहे. ‘तुम्ही #MeToo बद्दल ऐकले आहे. माझ्या काळात अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्री सोडली. काहींनी हार मानली. पण, अशी काही जणी आहेत ज्या अजूनही इंडस्ट्रीत टिकून आहेत. त्यांनी हार मानली नाही त्यापैकीच मी एक आहे अशे ती म्हणाली.
ईशा कोप्पीकर पुढे म्हणाली, वयाच्या 18 व्या वर्षी मला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. कास्टिंग काउचसाठी सेक्रेटरीमार्फत एका बड्या अभिनेत्याने माझ्याशी संपर्क साधला. मी 18 वर्षांची होते. त्या अभिनेत्याने मला सांगितले, काम मिळवण्यासाठी मला कलाकारांशी मैत्री करावी लागेल. मी खूप मैत्रीपूर्ण आहे. पण, मैत्रीपूर्ण म्हणजे काय? याचा मला अर्थ कळला नाही असे ती म्हणाली.
अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने सांगितले की एकदा तिला ए-लिस्ट अभिनेत्याने एकटे भेटण्यास सांगितले. त्यावेळी मी 23 वर्षांची होते. त्या अभिनेत्याने मला आणण्यासाठी त्याच्या ड्रायव्हरला पाठवले होते. त्याशिवाय त्याने याबद्दल कुठेही बोलू नको असे सांगितले होते. त्याचे कारण म्हणजे त्याचे इतर अभिनेत्रींसोबत संबंध असल्याच्या त्यावेळी जोरदार अफवा होत्या. तो म्हणाला, त्याच्याबद्दल आधीच वाद आहेत. पण, मी त्याला एकटी येऊ शकत नाही असे सांगून नकार दिला.
अभिनेते आणि दिग्दर्शक यांचे सेक्रेटरी तिला अयोग्यरित्या स्पर्श करायचे. ते येऊन फक्त अयोग्य स्पर्शच करत नव्हते तर हातही दाबायचे. तुला नायकांशी खूप मैत्री करावी लागेल असे सांगून ते घाणेरड्या रीतीने स्पर्श करायचे असेही ईशा म्हणाली.