‘लोक काहीही म्हणूदेत..’; पतीच्या दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

या दोघांच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले आहेत. लग्नानंतर महालक्ष्मीला अनेकदा पतीवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र सोशल मीडियावर रवींद्रसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करण्यात ती कधीच मागे हटत नाही.

'लोक काहीही म्हणूदेत..'; पतीच्या दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर
पतीच्या दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 1:25 PM

केरळ: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मीने निर्माता रवींद्र चंद्रशेखरशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले आहेत. लग्नानंतर महालक्ष्मीला अनेकदा पतीवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र सोशल मीडियावर रवींद्रसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करण्यात ती कधीच मागे हटत नाही. तर रवींद्रनेही महालक्ष्मीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

महालक्ष्मीचा फोटो शेअर करत रवींद्रने या पोस्टमध्ये लिहिलं, ‘तू माझ्यावर प्रेम करतेस म्हणून मी आनंदी नाही. तर तू पूर्णपणे माझ्यासाठी जगतेस, म्हणून मी आनंदी आहे. जरी मी हे व्यक्त करत नसलो तरी.. अम्मू या 100 दिवसांसाठी मी खूप चांगली पोस्ट लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मला मनापासून जे वाटतं ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.’

हे सुद्धा वाचा

‘अम्मू.. 37 वर्षांनंतर.. मी या 100 दिवसांतील प्रत्येक सेकंद आनंदाने जगलोय’ असंही त्याने पुढे लिहिलंय. दुसरीकडे महालक्ष्मीनेही वीरेंद्रसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ‘लोक काहीही म्हणूदेत, मी तुझ्यावर तोपर्यंत प्रेम करीन जोपर्यंत माझं हृदय धडधडणं बंद होणार नाही. तुझ्याशिवाय मी काहीच नाही’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

महालक्ष्मीचं हे दुसरं लग्न आहे. पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर तिने रवींद्रशी लग्न केलं. या दोघांची पहिली भेट ‘विदियुम वरई काथिरु’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली.

महालक्ष्मीने ‘वाणी रानी’, ‘चेल्लामय’, ‘ऑफिस’, ‘अरसी’, ‘थिरु मंगलम’, ‘यामिरुक्का बयामेन’ आणि केलाडी कनमनी यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर रवींद्र चंद्रशेखरने ‘नालनम नंदिनीयम’, ‘सुट्टा कढ़ाई’, ‘नत्पुना एन्नानु थेरियुमा’ आणि ‘मुरुंगकाई चिप्स’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.