Video | ऋषी कपूर यांच्या आठवणीने आजही नीतू यांना कोसळत रडू, शेअर केला भावूक व्हिडीओ

पती आणि दिवंगत अभिनेता ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या निधनानंतर अभिनेत्री नीतू सिंह (Neetu Singh) अद्याप स्वत:ला सांभाळू शकल्या नाहीयत. नीतू आता त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात व्यस्त झाल्या आहेत, परंतु ऋषी कपूर यांच्या आठवणी त्यांच्यापासून क्षणाभर दुरावत नाहीत.

Video | ऋषी कपूर यांच्या आठवणीने आजही नीतू यांना कोसळत रडू, शेअर केला भावूक व्हिडीओ
ऋषी कपूर
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 6:40 PM

मुंबई : पती आणि दिवंगत अभिनेता ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या निधनानंतर अभिनेत्री नीतू सिंह (Neetu Singh) अद्याप स्वत:ला सांभाळू शकल्या नाहीयत. नीतू आता त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात व्यस्त झाल्या आहेत, परंतु ऋषी कपूर यांच्या आठवणी त्यांच्यापासून क्षणाभर दुरावत नाहीत. आज (25 मार्च) सकाळी नीतूने ऋषी ​​कपूरच्या आठवणी असणारा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ नीतू यांनी ऋषी कपूर यांच्या मृत्यूच्या 11 महिन्यांनंतर आयोजित प्रार्थना सभेत शेअर केला होता (Actress Neetu Singh share emotional video of late husband actor rishi kapoor).

हा व्हिडीओ शेअर करताना नीतूने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज ऋषीजींची 11 महिन्यांनंतरची प्रार्थना सभा होती, न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या शेवटच्या सहलीच्या या काही आठवणी…’ या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ऋषी कपूर आपल्या सहलीचा खूप आनंद घेत आहेत. एवढेच नाही तर ते एक गाणे देखील गुणगुणत ​​आहेत. त्यांची ही धमाल नीतू कपूर आपल्या कॅमेर्‍यामध्ये कैद करत होत्या.

पाहा व्हिडीओ

लेकीलाही आली वडिलांची आठवण!

नीतू सिंहशिवाय ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर हिनेही त्यांचा एक जुना फोटो शेअर केला असून, तिलाही आज तिच्या वडिलांची आठवण येते आहे. हा फोटो शेअर करताना रिद्धिमाने लिहिले, ‘तुमचे प्रेम आमचा मार्ग सुकर करेल. आपल्या आठवणी नेहमी आमच्यासोबत आणि आमच्या हृदयामध्ये राहतील.’ (Actress Neetu Singh share emotional video of late husband actor rishi kapoor).

रणधीर कपूरही झाले भावूक

त्याचवेळी काही दिवसांपूर्वी अभिनेते रणधीर कपूरही आपले दोन भाऊ ऋ कपूर आणि राजीव कपूर यांच्या आठवणीत भावनिक झाले होते. रणधीर यांनी दोन दिवसांपूर्वी ऋषी ​​आणि राजीव यांचा तारुण्यातील एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये ऋषी आणि राजीव बऱ्यापैकी देखणे दिसत होते. ऋषी आणि राजीवच्या आठवणीत रणधीर कपूर लिहितात, ‘माझ्या दोन्ही लाडक्या भावांनो तुमची आठवण येते आहे. तुम्ही जिथे असाल तिथे दोघेही सुखी असाल अशी आशा आहे.’

अभिनेते ऋषी कपूर यांचे गेल्या वर्षी 30 एप्रिल रोजी निधन झाले होते. जवळजवळ दोन वर्षे त्यांनी कर्करोगाशी लढाई लढली.  परंतु, 30 एप्रिल रोजी त्यांची ही लढाई संपुष्टात आली. त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कपूर घराणे अद्याप पूर्णपणे सावरले नव्हते, तेच 9 फेब्रुवारी 2021 रोजी राजीव कपूर यांचे देखील निधन झाले.

(Actress Neetu Singh share emotional video of late husband actor rishi kapoor).

हेही वाचा :

R Madhavan  | आमीर खाननंतर आर. माधवनलाही कोरोनाची लागण, ‘ऑल इज वेल’ म्हणत शेअर केली पोस्ट!

Janhvi Kapoor | ‘फोटोतला तो मुलगा कोण?’, जान्हवी कपूरच्या नव्या फोटोंवर चाहत्यांचा सवाल!

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.