Video | Indian Idol 12च्या मंचावर रेखाला आली अमिताभ बच्चनची आठवण, ‘मुकद्दर’च्या गाण्यावर केली बिग बींची नक्कल!

‘इंडियन आयडॉल 12’चा (India Idol 12) हा आठवडा चांगलाच गाजणार आहे. कारण या संगीत कार्यक्रमाची शान वाढवण्यासाठी बॉलिवूडची दिवा अभिनेत्री रेखा यांनी या मंचावर हजेरी लावली होती.

Video | Indian Idol 12च्या मंचावर रेखाला आली अमिताभ बच्चनची आठवण, ‘मुकद्दर’च्या गाण्यावर केली बिग बींची नक्कल!
अभिनेत्री रेखा
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 3:04 PM

मुंबई : सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो  ‘इंडियन आयडॉल 12’चा (India Idol 12) हा आठवडा चांगलाच गाजणार आहे. कारण या संगीत कार्यक्रमाची शान वाढवण्यासाठी बॉलिवूडची दिवा अभिनेत्री रेखा यांनी या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी रेखा यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभव आणि अनेक मजेदार गोष्टी ‘इंडियन आयडॉल’चे परीक्षक आणि स्पर्धकांसह शेअर केल्या आहेत. इतकेच नाही, तर 66 वर्षीय अभिनेत्री तिच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांची गाणी ऐकताना, रंगमंचावर मंत्रमुग्ध झालेली दिसणार आहे. या संगीताच्या सेलिब्रेशनमध्ये ही बॉलिवूड अभिनेत्री कंटेस्टंट दानिश खानचे तोंडभरून कौतुक करताना दिसणार आहे (Actress Rekha On Indian Idol 12 set missing Amitabh Bachchan).

खरं तर, या शनिवारी रेखा स्पेशल भागात, दानिश खान ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘हे नाम रे’ या चित्रपटातील गाणी रंगमंचावर सादर करणार आहे. दानिश गात असलेली ही दोन्ही गाणी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या चित्रपटातील आहेत. दानिशचा मधुर आवाज ऐकून रेखा नॉस्टॅल्जियात हरवणार आहेत. तर दानिशच्या या सादरीकरणानंतर हे तीन परीक्षक उभे राहून टाळ्या वाजवताना दिसनार आहेत. फक्त परीक्षकच नव्हे, तर रेखा देखील दानिशचे खूप कौतुक करणार आहेत. इतकेच नाही तर रेखा दानिशाच्या गाण्यावर इतक्या प्रभावित होतील की त्या शगुन म्हणून दानिशला काही पैसेही देतील आणि स्टेजवर जाऊन त्याची नजर काढतील.

पाहा व्हिडीओ :

 (Actress Rekha On Indian Idol 12 set missing Amitabh Bachchan)

रेखा यांना आली अमिताभ बच्चन यांची आठवण!

या सुंदर बॉलिवूड अभिनेत्रीच्या हस्ते आपल्या मुलाचे कौतुक पाहून तेथे उपस्थित दानिशच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इतकेच नव्हे तर दानिशने रेखा यांना रंगमंचावर बोलावले आणि मुकद्दर का सिकंदर या गाण्यावर त्याने रेखा यांच्याबरोबर परफॉर्मन्स दिला. यावेळी इतर स्पर्धकही त्यांच्यात सामील झाले. हे गाणे ज्या प्रकारे अमिताभ बच्चनवर चित्रित केले गेले होते, त्याच प्रकारे रेखा यांनी इंडियन आयडॉलच्या स्टेजवर हार्मोनियमजवळ बसून अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे बाईक चालवल्याची नक्कल केली.

दानिशला तोंडभरून आशीर्वाद

रेखाने दानिशच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक करत म्हटले की, ‘आज तू उस्तादांसारखी कामगिरी केलीस. तुझ्याकडे ती गुणवत्ता आहे, ते कौशल्य आहे जे एक उस्तादाकडे असणे आवश्यक आहे. देव तुला खूप आशीर्वाद देवो आणि अशाच चमकत राहा. तुझ्यासमोर उज्ज्वल भविष्य आहे.’

(Actress Rekha On Indian Idol 12 set missing Amitabh Bachchan)

हेही वाचा :

Bollywood Movies In April | कोरोना लॉकडाऊनचं सावट, तरीही बॉक्स ऑफिसवर नशीब आजमवणार ‘हे’ बॉलिवूड चित्रपट…

Parineeti Chopra | ‘सायना’गर्ल परिणीती चोप्राचा ‘टॉपलेस’ अवतार, बोल्ड लूक पाहून चाहते म्हणतायत…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.