‘अशी ही बनवाबनवी’ फेम शंतनूच्या आठवणीत बायकोनं केलं टक्कल; म्हणाली ‘मी स्वत:ला मुक्त..’
Bollywood Actress bald look: नवऱ्याच्या निधनानंतर अभिनेत्रीचा लक्षवेधी लूक, दिवंगत पतीचा ब्लेझर आणि टक्कल, अभिनेत्री म्हणते, 'आपण स्वतःला पिंजऱ्यात बंद करतो पण...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोशूटची चर्चा...

Bollywood Actress bald look: 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शांती प्रिया तुम्हाला आठवत असेलच. अभिनेत्रीने अक्षय कुमार याच्यासोबत ‘सौगंध’ तर, अभिनेता सनी देओल याच्यासोबत ‘वीरता’ आणि अन्य अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावली. आता शांती प्रिया मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अशात शांती प्रिया हिने दिवंगत नवऱ्याच्या ब्लेझरमध्ये फोटोशूट केलं आहे. नवऱ्याच्या निधनानंतर अभिनेत्रीचा लक्षवेधी लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
टक्कल करून अभिनेत्री नवऱ्याच्या ब्लेझरमध्ये फोटोशूट केलं आहे. शांती प्रिया ही ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमात शंतनू ही भूमिका साकारणारा दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रे याची पत्नी आहे. अनेकांना शांती प्रिया हिचा लूक आवडलेला आहे. तर अनेकांनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. काही दिवसांपूर्वी शांती प्रिया हिने टक्कल आणि नव्या नवरीच्या लूकमध्ये फोटोशूट केलं होतं.




आता देखील अभिनेत्रीने हटके लूक करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणते, ‘नुकताच मी टक्कल केलं आहे. महिला असल्यामुळे आपण आपल्या भोवती मर्यादा ठरवतो. नियमांचं पालन करतो आणि स्वतःला एका पिंजऱ्यात बंद करतो. पण या बदलासह मी स्वतःला मुक्त केलं आहे.’ सध्या अभिनेत्रीने पोस्टसाठी लिहिलेलं कॅप्शन देखील चर्चेत आहे.
View this post on Instagram
शांती प्रिया हिने मेकअपसह तिच्या टक्कल लूकला एक उत्कृष्ट टच दिला. तिने गुलाबी ओठ, तपकिरी आयशॅडो, आयलायनर, मस्कारा आणि ब्लश लावून तिचे सौंदर्य वाढवलं आहे. हटके लूक करून अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आणि आता लोक सोशल मीडियावर तिच्याबद्दल चर्चा करत आहेत.
अनेकांना अभिनेत्री नवा लूक आवडला आहे. तर अनेकांनी टीका केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘हे काय केलस… लांब केस म्हणजे दाक्षिणात्य महिलांचं सौंदर्य आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सॉरी… पण तू नव्हतं करायला पाहिजे…’, ‘आता टकली म्हणालो की बॉडी शेमिंगचा आरोप करेल…’ असं देखील अभिनेत्रीला नेटकरी म्हणत आहेत.