Shikha Malhotra : स्ट्रोकनंतर अभिनेत्री शिखा मल्होत्राची भावनिक पोस्ट, प्रकृतीत सुधारणा
शिखा मल्होत्रानं आता आईसोबतचा एक फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे. (Actress Shikha Malhotra's emotional post after stroke)
मुंबई : शाहरुख खानसोबत फॅन या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री शिखा मल्होत्रा कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आली होती. शिखाला स्ट्रोक आणि पॅरालिसीस झाला आहे. आता तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे मात्र स्ट्रोक आणि पॅरालिसीस याचा परिणाम तिच्या शरीराच्या डाव्या बाजूवर झाला आहे. शिखानं आता एक पोस्ट शेअर करत आता आपण आधीसारखं चालू शकणार की नाही, अशी भीती व्यक्त केलीय.
शिखानं आता आईसोबतचा एक फोटो शेअर करत ‘ हळूहळू का होईना पण माझ्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.मला शंका आहे की मी आधी सारखं चालू शकणार की नाही.’ असं कॅप्शन दिलं आहे. सोबतच तिनं एका मुलाखतीत सांगितलं की, स्ट्रोक आल्यानंतर आधी तिला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र प्रकृतीत सुधारणा नसल्यानं तिला केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं.
View this post on Instagram
नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शिखा म्हणाली होती की ‘माझं शरीर आता ठीक नाही, मात्र जेव्हा मी माझ्या ‘कांचली’ या चित्रपटाबद्दल विचार करते तेव्हा माझं हृदय आनंदानं फुलून येतं. या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत झळकली आहे. शिखा पुढे म्हणाली- अनेकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी माहिती नाही. मी आयुष्यातील एका कठीण टप्प्यातून जात आहे. मी माझ्या कामाबद्दल खूपच पॅशनेट आहे आणि मला तुम्हा सगळ्यांच्या आधाराची गरज आहे.
शिखानं कोरोना काळात नर्सच्या रुपात गरजू लोकांची सेवा केली होती. तिनं वर्धमान महावीर कॉलेज सफदरजंग हॉस्पिटलमधून नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. कोरोना काळापूर्वी तिनं कधीही नर्स म्हणून काम केलं नाही. मात्र गरज असताना ती पुढे आली होती.
संबंधित बातम्या
New Web Series | सनी लियोनीचा एक्शन धमाका, लवकरच ‘या’ वेब सीरीजमध्ये दिसणार !
वाढदिवसाच्या पार्टीत गोविंदाचा पत्नीसोबत डान्स, पाहा व्हिडीओ
Video | सारा अली खानची शायरी ऐकून अक्षय कुमारच्या डोळ्यात आले पाणी!