ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस मुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल, युजर्स म्हणाले – झेब्रा क्रॉसिंग

Shilpa Shetty: काल संध्याकाळी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये शिल्पा शेट्टी ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोहोचली. मात्र त्या फंक्शनमधील आउटफिटमुळे तिला ट्रोल केले जात आहे.

ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस मुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल, युजर्स म्हणाले - झेब्रा क्रॉसिंग
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 1:07 PM

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक असून नियमित वर्कआऊटही करत असते. काल संध्याकाळी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये शिल्पा अतिशय स्टायलिश (stylish) अवतारात दिसली. मात्र ही अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. खरंतर शिल्पाला तिच्या आउटफिटमुळे ट्रोलिंगचा (trolling) सामना करावा लागत आहे.

ब्लॅक अँड व्हाइट स्ट्राइप्स आउटफिट घालून इव्हेंटमध्ये पोहोचली होती शिल्पा

खरंतर या इव्हेंटमध्ये शिल्पा शेट्टी टू पीस ब्लॅक अँड व्हाइट स्ट्रीप आउटफिट घालून पोहोचली. तिने सोन्याच्या नेकलेसने तिचा लूक ॲक्सेसराइज केला आणि लाल लिपस्टीकच्या मदतीने तिचा ग्लॅम लूक पूर्ण केला. कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी अभिनेत्रीने हसतमुखाने कॅमेऱ्यासमोर पोजही दिली. मात्र, नेटिझन्सना शिल्पाचा आउटफिट आवडला नाही आणि त्यामुळे तिला आता ट्रोल केले जात आहे.

शिल्पा होत्ये ट्रोल

सोशल मीडियावर ट्रोल होत असलेल्या शिल्पा शेट्टीसाठी एका यूजरने लिहिले की, “पार्टीमध्ये (आला) झेब्रा.” तर दुसर्‍या युजरने टिप्पणी केली, “तिला मेट गालाची फीलिंग येत आहे!” आणखी एक युजर म्हणाला, “झेब्रा क्रॉसिंग!” एक नेटिझन म्हणाला, “अर्बन झेब्रा!” काही चाहत्यांनी अभिनेत्रीच्या लुकचे कौतुकही केले.

कामाबद्दल बोलायचे झाले तर शिल्पा शेट्टी लवकरच ‘केडी – द डेव्हिल’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती सत्यवतीची भूमिका साकारणार आहे. उगादीच्या निमित्ताने अभिनेत्रीने तिच्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. या चित्रपटात संजय दत्तही नकारात्मक भूमिकेत आहे. हा चित्रपट 1970 च्या दशकातील आहे. तसेच शिल्पाच्या खात्यात अजून ‘सुखी’ आणि ‘इंडियन पुलिस फोर्स’ हे देखील आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.