Sonakshi Sinha : हा तर धोका… सोनाक्षीशी लग्न झाल्यावर जहीर इक्बालचं वक्तव्य चर्चेत
सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून ती पती सोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहे. दरम्यान, लग्नाला काही दिवसही होत नाहीत तोच जहीर इक्बालने असं काही विधान केलंय ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचं नुकतच लग्न झालं असून सध्या की ती पती झहीर इक्बालसोबत तिचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या कपलने त्यांच्या डेटिंगपासून ते वैवाहिक आयुष्यापर्यंतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या पोस्ट्सना लाईक्सही खूप मिळतात. मात्र लग्नाला काही दिवसही उलटत नाहीत तोच जहीर इक्बालने असं काही विधान केलंय ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. सोनाक्षी सिन्हाने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवर जहीरने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा तर धोका आहे, असे जहीरने म्हटले होते, मात्र तो नेकं असं का म्हणाला, झालं तरी काय ? चला जाणून घेऊया.
सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. लग्नानंतरच्या डेट नाइटसाठी ती तयारी करत होती. व्हिडिओमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सोनाक्षी सिन्हाने ही पोस्ट करताच पती झहीरने दोन मजेशीर कमेंट्स केल्या.
काय म्हणाला जहीर इक्बाल ?
जहीर इक्बालने पहिल्या कमेंटमध्ये लिहिलं की, ‘माझ्यासोबत धोका झाला आहे .’ तर दुसऱ्या कमेंटमध्ये त्याने म्हटलं की ‘यामध्ये आश्चर्यचकित होण्यासारखं नाही. तू नेहमीच माझ्याआधी तयार होते. ही तर चाटिंग आहे.’ या कमेंटसोबतच त्याने काही स्माईली, इमोजीही पोस्ट केलेत. सोनाक्षी सिन्हाचा पती झहीर इक्बालच्या कमेंटवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
पतीबद्दल काय म्हणाली सोनाक्षी सिन्हा ?
सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच एक मुलाखत दिली, तेव्हा तिने लग्नानंतरच्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. ती म्हणाली की झहीरशी लग्न करून मला घरी परत आल्यासारखे वाटते आहे कारण आता तिला झहीरसोबत अधिक क्वॉलिटी टाईम घालवण्याची संधी मिळते. आम्ही नेहमीच चांगले मित्र होते. आमचं लग्न लवकर झालं असतं तर किती बरं झालं असत, असंही सोनाक्षी म्हणाली होती. 23 जून रोजी सोनाक्षी आणि जहीर यांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं, त्याआधी ते दोघे 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
कामाबद्दल बोलायचं झालं तर सोनाक्षी सिन्हा हिचा ‘काकुडा’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, जो लोकांना खूप आवडला. हा चित्रपट OTT वर उपलब्ध आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हाने साकिब अली आणि रितेश देशमुखसोबत काम केलं आहे.