अभिनेत्री सुश्मिता सेनच्या जवळच्या व्यक्ती Animal एकदम वाईट रिव्यू, म्हणाला…

राजीव सेननं अॅनिमल चित्रपटाला बकवास चित्रपट म्हटलं आहे. तसंच त्यानं त्याला चित्रपटातील कोणत्या गोष्टी खटकल्या याबाबतही सांगितलं आहे. तर दुसरीकडे राजीवनं रणबीर कपूर आणि बॉबी देओलचं कौतुक देखील केलं आहे.

अभिनेत्री सुश्मिता सेनच्या जवळच्या व्यक्ती Animal एकदम वाईट रिव्यू, म्हणाला...
Animal
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 1:21 AM

मुंबई : सध्या अॅनिमल या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला असून बॉक्स ऑफिसवर त्यानं धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी देखील या चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शवली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी यांनी दमदार असा अभिनय केला आहे. सगळीकडे या कलाकारांच्या अभिनयाचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातंय. यामध्ये आता अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेननं देखील अॅनिमल चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे.

राजीव सेन हा एक यूट्यूब व्लॉगर आहे. त्यानं नुकत्याच अपलोड केलेल्या त्याच्या व्लॉगमध्ये अॅनिमल चित्रपट त्याला कसा वाटला याबाबत सांगितलं आहे. तो म्हणाला की, मी अॅनिमल चित्रपटाचा प्रामाणिकपणे खरा रिव्ह्यू देऊ इच्छितो. या चित्रपटात रणबीरनं खूपच हिम्मतवाला आणि चॅलेंजिंग असा रोल साकारला त्यासाठी त्याला 10 पैकी 10 पॉइंट मिळतात. त्याला माझा सलाम आहे. तसंच मला वाटतं की बर्फी या चित्रपटानंतरचा हा रणबीरचा सर्वात उत्कृष्ट असा अभिनय आहे.

पुढे मिस्टर बॉबी देओलबद्दल बोलायचं झालं तर, तो खूपच शानदार आहे. बॉबीजी आपण जेव्हा फ्लाईमध्ये भेटलो होतो तेव्हा आपण खूप गप्पा मारल्या होत्या. पण तुम्ही अॅनिमलमध्ये एकही शब्द न बोलता तुमच्या डोळ्यांनी आणि बॉडी लँग्वेजने दमदार असा अभिनय केला आहे. काहीही न बोलता प्रेक्षकांचं मन जिंकणं हे खूप खास आहे, असं राजीव म्हणाला.

राजीव पुढे म्हणाला की, या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही मला जर विचारलं की मला हा चित्रपट कसा वाटला तर मी सांगेन खूपच खराब. मी या चित्रपटाशी कनेक्ट होऊ शकलो नाही कारण या चित्रपटात खूपच हिंसा दाखवण्यात आली. लोकांना मारणे, त्यांना टॉर्चर करणे ही गोष्ट खूपच वेगळी आहे. तसंच हा चित्रपट खूपच मोठा होता असं मला वाटतंय. सोबतच या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि चित्रपटाचे पॉइंट पाहता हा खूपच खराब चित्रपट आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.