AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता सेने हिने फोटो केला पोस्ट; प्रकृतीबद्दल दिली अपडेट

हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता सेन हिने एक खास फोटो शेअर दिली प्रकृतीबद्दल मोठी अपडेट; अभिनेत्रीचा फोटो पाहिल्यानंतर चाहते म्हणाले...

हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता सेने हिने फोटो केला पोस्ट; प्रकृतीबद्दल दिली अपडेट
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 1:09 PM

मुंबई : अभिनेत्री सुश्मिता सेन कायम तिच्या फिटनेसबाबत जागृत असते. जीम, योगा करत अभिनेत्री स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण अभिनेत्रीला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. इस्टाग्रामवर सुश्मिता सेन हिने याबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्सने लवकर बरी होण्याची प्रार्थना केली आहे. आता सुष्मिताची प्रकृती स्थिर आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता सेने पुन्हा फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे. सुश्मिताने स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये सुश्मिता वर्कआऊट करताना दिसते. सध्या सर्वत्र सुश्मिताची पोस्ट व्हायरल होत आहे.

फोटो पोस्ट करत सुश्मिताने कॅप्शनमध्ये, ‘माझी प्रकृती आता ठिक होत आहे. माझ्या हृदयरोगतज्ञांच्या परवानगीने आता मी स्ट्रेचिंग करायला सुरुवात केली आहे. अशाप्रकारे माझी होळी आनंदात साजरी झाली आहे. तुम्ही होळी कशी साजरी केली? अलं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

हे सुद्धा वाचा

सुश्मिताच्या पोस्ट कमेंट करत अनेकांनी अभिनेत्रीला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर अनेकांनी तब्यतीची काळजी घे… असं सांगितलं आहे. सध्या सर्वत्र सुश्मिताच्या पोस्टची चर्चा रंगत आहे. सुश्मिताने वडिलांसोबत एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना कठीण दिवसांबाबत सांगितलं.

शिवाय अभिनेत्रीने या कठीण प्रसंगी ज्यांनी मदत केली, त्यांचे देखील अभार मानले आहेत. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे. सुश्मिताने पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या उत्तम आरोग्यासाठी चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी देखील प्रार्थना करत आहेत.

सुष्मिताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री ‘आर्या २’ वेब सीरिजच्या यशानंतर ‘आर्या ३’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारकाना दिसणार आहे. सध्या सर्वत्र सुष्मिताच्या ‘आर्या ३’ सीरिजची चर्चा रंगत आहे. चाहते ‘आर्या ३’च्या प्रतीक्षेत आहेत. सुष्मिता कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असते. त्यामुळे अभिनेत्री ‘आर्या ३’ सीरिजची घोषणा कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

सुष्मिता सेन कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.