अभिनेत्री उर्मिला निंबाळकरला आला भयानक अनुभव, भर बाजारात दोन वर्षांच्या मुलासोबत घडलं असं काही…

उर्मिला निंबाळकर हिने या धक्कादायक आणि दुःखद घटनेबद्दल पोस्ट शेअर करत चिंता व्यक्त केली. हा प्रसंग अतिशय 'असुरक्षित' असल्याचेही तिने म्हटले आहे.

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरला आला भयानक अनुभव, भर बाजारात दोन वर्षांच्या मुलासोबत घडलं असं काही...
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 11:16 AM

पुणे | 8 नोव्हेंबर 2023 : मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्री आणि प्रसिद्ध यू-ट्यूबर उर्मिला निंबाळकर (actress urmila nimbalkar) ही खूपच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर ती सतत नवनवे अनुभव शेअर करत असते. चाहतेही तिच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. सध्या ती अभिनय क्षेत्रात कार्यरत नसली तरी यू-ट्यूबच्या माध्यमातून ती प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

तिच्या सोशल मीडियावर ती स्वत:चे आणि तिचा नवरा सुकीर्त गुमास्ते आणि मुलगा अथांग या दोघांचेही बरेच फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तसेच मुलासोबतचे अनेक अनुभवही ती पोस्ट करते. मात्र नुकताच तिने एक असा अनुभव शेअर केला जो वाचून तुम्हीही क्षणभरासाठी सुन्न व्हाल. ती नवरा आणि मुलासोबत बाजारात खरेदीसाठी गेलेली असताना, तिच्या मुलासोबत जे घडलं ते वाचून कोणीही हादरेल. तिथे नेमकं काय झालं, वाचूया…

उर्मिलाने ही पोस्ट लिहीत चाहत्यांना एक विनंतीदेखील केली आहे.

उर्मिलाची पोस्ट तिच्या शब्दात जशीच्या तशी…

“एक कळकळीची विनंती… आज (काल) संध्याकाळी मी, सुकीर्त आणि अथांग रस्त्यावर आकाशकंदील खरेदी करताना, मागून अचानक एक बाई आल्या. त्यांनी अथांगला अचानक मागून पकडले आणि जोरात त्याचे गाल ओढले. त्यामुळे तो खूपच घाबरला आणि रडायला लागला. ही बाळांमधील या वयातील अतिशय नैसर्गिक प्रतिक्रिया आहेत. त्याला ‘Stranger Danger’ असे वैज्ञानिक नावही आहे.”

” अथांगला व्हिडीओमध्ये पाहून त्याच्याविषयी प्रेमाची भावना असणे हे अगदी बरोबर आहे. पण २५ महिन्याच्या बाळाला त्याच्या इच्छेविरुद्ध ओढून त्याचे फोटो काढणे, तो रडत असतानाही त्याला ओढून स्वतःच्या जवळ खेचणे, बाहेरील अस्वच्छ हाताने बाळाला पकडणे, तो हात लावू देत नाही म्हणून पाठमोरे होऊन त्याला नावं ठेवत जाणे हे अयोग्य आहे आणि अथांगसाठी असुरक्षितही.

विचारल्यानंतर फोटोच काय तर घरी जेवायला सुद्धा येऊ आम्ही, परंतु आपल्या अट्टाहासात बाळाचे हाल करणे मला पटत नाही,” असं स्पष्ट आणि परखड मत उर्मिलाने या तिच्या स्टोरीमधून मांडलं. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.